‘दिंडी | Way Of Life’ची UAEच्या Almamoura Festivalमध्ये Official Selection

‘दिंडी’ची दुबईच्या Almamoura Festivalमध्ये अधिकृत निवड; पुण्यात ‘WARI TOURISM’ विशेष सन्मान; कोलकात्यात Official Selectionनंतर आंतरराष्ट्रीय प्रवासाला एक महत्त्वाची नोंद

rayatsamachar
4 Min Read

अहिल्यानगर | ०३.१० | प्रतिनिधी

येथील स्वतंत्र चित्रपट निर्माते भैरवनाथ चंद्रभागा तुकाराम वाकळे यांच्या ‘दिंडी | Way of Life’ या मराठी निरीक्षणात्मक लघुपटाची संयुक्त अरब अमिरातीतील दुबई (UAE) Almamoura Festival 2026 मध्ये अधिकृत निवड झाली. FilmFreewayवरील निवड नोंदीनुसार Dindi | Way of Life हा चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी Official Selected झाला आहे, अशी माहिती किरण दत्तराज डहाळे यांनी दिली.

किरण डहाळे पुढे म्हणाले, दुबईतील अबुधाबी येथे आयोजित होणारा Almamoura Festival हा सिनेमा, सर्जनशीलता, संस्कृती आणि कथाकथनाला समर्पित आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे. महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळानुसार जगभरातील चित्रपट निर्माते, कलाकार आणि प्रेक्षकांना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट महोत्सवाचे असून १२ ऑक्टोबर २०२६ पासून महोत्सव सुरू होणार आहे.

वारी अनुभवाची निरीक्षणप्रधान मांडणी :

- Advertisement -

‘दिंडी | Way of Life’ हा अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील अगस्ती संस्थान दिंडी सोहळा वारीतील दिंडीचा अनुभव निरीक्षणप्रधान सिनेमाच्या माध्यमातून मांडणारा मराठी लघुपट आहे. चित्रपटात वारीकडे केवळ धार्मिक सोहळा म्हणून न पाहता, तिच्यातील समता, माणसं, चालण्याची लय, सामूहिकता आणि जीवनपद्धती यांचे दृश्यात्मक निरीक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन आणि मांडला भैरवनाथ चंद्रभागा तुकाराम वाकळे यांनी केली असून आवाज निवेदन (Voice-over) किरण दत्ताराज डहाळे यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती रयत चित्र फिल्म्सच्या वतीने करण्यात आली आहे.

पुण्यात ‘WARI TOURISM’साठी विशेष सन्मान : ‘दिंडी | Way of Life’च्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय महोत्सवी प्रवासात यापूर्वी पुणे येथील 5th International Tourism Short Film Festival (ITSFF) 2026 मध्ये चित्रपटाची अधिकृत निवड झाली होती. या महोत्सवात चित्रपटाला ‘Special Recognition Award for WARI TOURISM’ हा विशेष सन्मान प्राप्त झाला. वारी आणि तिच्याशी संबंधित सांस्कृतिक पर्यटनाचा विषय निरीक्षणप्रधान पद्धतीने मांडल्याबद्दल मिळालेली ही मान्यता चित्रपटाच्या प्रवासातील महत्त्वाची नोंद ठरली.

Almamoura Festival

कोलकात्यातही Official Selection : यापूर्वी International Tagore Film Awards 2026, Kolkata येथेही ‘दिंडी | Way of Life’ची Official Selection झाली आहे. त्यामुळे पुणे आणि कोलकाता या दोन्ही ठिकाणच्या महोत्सवी मान्यतांनंतर आता UAEमधील Almamoura Festivalमध्ये झालेली निवड चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासातील आणखी एक नोंद ठरली.

मोबाईलवरून निर्मिती, आंतरराष्ट्रीय रसिकांपर्यंत प्रवास : विशेष म्हणजे ‘दिंडी | Way of Life’ची निर्मिती Samsung Galaxy S24 FE या स्मार्टफोनवर करण्यात आली असून चित्रपटाचे संपादन InShot या मोबाइल एडिटिंग ॲपवर करण्यात आले. ०३ मिनिटे ०८ सेकंद लांबीचा हा निरीक्षणात्मक लघुपट एका अखंड दृश्यातून वारीचा अनुभव मांडतो.

स्मार्टफोनच्या माध्यमातून निर्मित झालेला हा लघुपट आता अहिल्यानगर- पुणे- कोलकाता ते अबुधाबी अशा प्रवासातून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या मंचावर पोहोचत आहे.

- Advertisement -

दिग्दर्शक भैरवनाथ चंद्रभागा तुकाराम वाकळे, Voice-over कलाकार किरण दत्ताराज डहाळे आणि रयत चित्र फिल्म्सच्या या निर्मितीला Almamoura Festivalमधील अधिकृत निवडीमुळे आणखी एक आंतरराष्ट्रीय मंच मिळाला आहे.

या लघुपट निर्मीतीसाठी बीपीएचईच्या सीएसआरडीचे डॉ. सुरेश पठारे, सॅम्युअल वाघमारे, निहाल घोडके, संध्या मेढे, असिफखान दुलेखान, इजि. अभिजीत एकनाथ वाघ, उज्ज्वला वाकळे, आयएमएसच्या सायली तोरणे यांचे सहकार्य लाभले. तर पंकज गुंदेचा, तुषार सोनवणे, दिपक शिरसाठ, नवनाथ मगर, मरयम सय्यद, अतुल देठे, संतोष गायकवाड, विजय केदारे, समृद्धी वाकळे, समीक्षा वाकळे, भावना गायकवाड, एस्थर, रूतूजा शिंदे, इलिशा संगमा, खुशी राजभर, इमान्युअल, जोस, नागेश रासकर आदींचे सहकार्य लाभले.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading