अहिल्यानगर | १८.९ | रयत समाचार
जागतिक स्वच्छता दिन म्हणजेच World Cleanup Day निमित्त रयत चित्र फिल्म्स निर्मित ‘HYGIENE Habit of Swine’ या निरीक्षणप्रधान लघुपटाचे २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठिक ०७ वाजता YouTube वर Premiere करण्यात येणार आहे. जगभरात २० सप्टेंबर रोजी World Cleanup Day आयोजित केला जातो. २०२६ मधील World Cleanup Day देखील २० सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती अधिकृत World Cleanup Day संकेतस्थळावर देण्यात आली.
‘HYGIENE Habit of Swine’ हा संवादविरहित निरीक्षणप्रधान लघुपट असून, सार्वजनिक जागा, स्वच्छता आणि मानवी दैनंदिन वर्तन यांचा दृश्य माध्यमातून वेध घेणारा प्रयोग आहे. अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयालगतच्या परिसराचे निरीक्षण या लघुपटातून करण्यात आले आहे.

लघुपटाची निर्मिती Rayat Chitra Filmsच्या वतीने करण्यात आली असून दिग्दर्शन भैरवनाथ चंद्रभागा तुकाराम वाकळे यांनी केले आहे. लघुपट पूर्णपणे Samsung Galaxy S24 FE या मोबाइलद्वारे चित्रित करण्यात आला आहे. हा प्रयोग एकाच सलग शॉटमध्ये, कट किंवा झूमचा वापर न करता साकारण्यात आला आहे. लघुपट संवादविरहित असल्याने त्यात निवेदन अथवा संवादाचा वापर करण्यात आलेला नाही.
‘दिंडी | Way of Life’चीही आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल : रयत चित्र फिल्म्सच्या ‘DINDI | Way of Life’ या मराठी निरीक्षणात्मक लघुपटाला अलीकडेच कोलकाता आणि पुणे येथील चित्रपट महोत्सवांमध्ये अधिकृत निवड मिळाली आहे.
International Tagore Film Awards (ITFA) 2026, Kolkata येथे ‘DINDI | Way of Life’ची Official Selection झाली आहे. या निमित्ताने बंगाली चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांनी ITFA 2026 मध्ये सहभागी चित्रपट निर्मात्यांना विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्यात.
‘DINDI | Way of Life’चे दिग्दर्शन भैरवनाथ चंद्रभागा तुकाराम वाकळे यांनी केले असून आवाज किरण दत्तराज डहाळे यांचा आहे. या लघुपटाची निर्मिती Rayat Chitra Filmsने केली आहे. ITFA 2026चा कार्यक्रम ३० ऑक्टोबर २०२६ रोजी कोलकाता येथील Rathindra Mancha, Jorasanko Thakur Bari येथे होणार आहे.

याशिवाय International Tourism Short Film Festival (ITSFF) Pune 2026 मध्येही ‘DINDI | Way of Life’ची Official Selection झाली असून, पुण्यातील महोत्सवातील स्पर्धात्मक सहभागामुळे या लघुपटाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाची नोंद झाली आहे.
स्वच्छतेच्या प्रश्नाकडे निरीक्षणात्मक नजरेतून पाहण्याचा प्रयत्न : ‘HYGIENE Habit of Swine’च्या माध्यमातून स्वच्छतेचा प्रश्न केवळ घोषणांमधून किंवा संदेशप्रधान मांडणीतून न मांडता, प्रत्यक्ष सार्वजनिक परिसरातील दृश्य वास्तवाचे निरीक्षण करून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
World Cleanup Day हा जगभरातील नागरिकांना कचरा आणि अस्वच्छतेविरोधात प्रत्यक्ष कृतीसाठी एकत्र आणणारा जागतिक उपक्रम आहे. २०२६ मध्ये हा दिवस २० सप्टेंबर रोजी होणार असून, अधिकृत माहितीनुसार विविध देशांमध्ये लाखो लोक या उपक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
याच दिवशी ‘HYGIENE Habit of Swine’चे YouTube Premiere आयोजित करण्यात आल्याने लघुपटाच्या विषयाला त्याच्या प्रदर्शनाच्या दिवसाशी थेट संदर्भ मिळत आहे.
YouTube Premiere
लघुपट : HYGIENE Habit of Swine
निर्मिती : Rayat Chitra Films
दिग्दर्शन : भैरवनाथ चंद्रभागा तुकाराम वाकळे
प्रकार : निरीक्षणप्रधान लघुपट
भाषा : संवादविरहित
प्रदर्शन : २० सप्टेंबर २०२६, रोजी सकाळी ०७ वाजता.
माध्यम : YouTube Premiere
YouTube Premiere लिंक :
“HYGIENE Habit of Swine — YouTube Premiere”

रयत चित्र फिल्म्सच्या निरीक्षणप्रधान चित्रपटनिर्मितीच्या प्रवासात ‘HYGIENE Habit of Swine’ आणि ‘DINDI | Way of Life’ हे दोन स्वतंत्र प्रयोग असून, एका लघुपटातून सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रश्नाकडे पाहण्याचा प्रयत्न तर दुसऱ्या लघुपटातून वारकरी दिंडीच्या जीवनपद्धतीचे निरीक्षण मांडण्यात आलेय.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


