latest news: आरोग्यसेवा घरोघर पोहोचविण्याचा 30 समाजसेवकांचा निर्धार

बूथ हॉस्पिटल देत असलेल्या अल्पदरातील उत्कृष्ट आरोग्यसेवा रूग्णांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

अहमदनगर | ५ जानेवारी | प्रतिनिधी

(latest news) अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात सेवाभावी काम करणाऱ्या शासकीय, निमशासकीय व अशासकीय सुमारे ३० प्रतिनिधींच्या संयुक्त विचार विनिमय बैठकीमध्ये इव्हॅन्जलिन बूथ हॉस्पिटल देत असलेल्या अल्पदरातील उत्कृष्ट आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला. बूथ हॉस्पिटल व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्याचे आवाहन यावेळी मेजर देवदान कळकुंबे यांनी केले.

 

 मेजर देवदान कळकुंबे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना सन १९३९ पासून आरोग्यसेवेत असलेल्या बूथ हॉस्पिटल संदर्भात माहिती दिली.

 

(latest news) यावेळी ते म्हणाले, बूथ हॉस्पिटल या ठिकाणी मोफत डायलिसिस ही महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत देण्यात येते. अत्यंत कमी खर्चात दर शनिवारी सर्व तपासण्या, विनामूल्य दातांची तपासणी, तसेच अल्प दरात एक्स-रे, सोनोग्राफी तसेच इतर अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त असलेले ऑपरेशन थिएटर, तज्ञ डॉक्टर्स, अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन प्लांट, आरोग्यदायी वातावरण यांच्यासह सर्व अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. बूथ हॉस्पिटल हे गेले अनेक वर्ष सेवाभावी हॉस्पिटल म्हणून कार्यरत असून या ठिकाणी कोविड, टीबी, एचआयव्हीसारख्या अत्यंत दुर्धर आजारांवर रुग्णांना उत्तम सेवा देऊन चांगल्या कामाचा पायंडा पाडलेला आहे.latest news

 

येथे उपलब्ध असणाऱ्या सेवा सुविधा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचाव्यात. याचा लाभ घेता यावा यासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींनी मौलिक सूचना केल्या. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिक्षण, वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेणे, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, शाळा या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे घेणे. गरीब वस्त्यांमध्ये नागरिकांचे आजाराबद्दलचे गैरसमज काढून योग्य आहार त्याचप्रमाणे विविध आजारांबद्दलची जनजागृती मेडिकलचे कॅम्प यांसारख्या विविध योजना राबविण्यात संदर्भात चर्चा केली. किशोरवयीन मुली व महिला यांच्यामधील आजारांचे प्रमाण जास्त असल्याने तसेच लहान मुले त्याचप्रमाणे संस्थांमध्ये दाखल असणारे निराधार किंवा विनाकुटुंब राहणारी मुले यांच्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

 

नागरिकांमध्ये आजार होऊ नयेत. साथीच्या रोगांसारखे आजार पसरू नयेत यासाठी घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाय व त्याचप्रमाणे आजारी नागरिक, रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी बूथ हॉस्पिटल हे सदैव सहकार्य करीत आले आहे. येथून पुढे हॉस्पिटलच्या सेवा व नागरिक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचा निर्णय उपस्थित असलेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. बूथ हॉस्पीटल हे समाजातील तळागाळातील लोकांना त्याचबरोबर सर्वस्तरातील जनतेला सेवा देण्यास सदैव तत्पर आहे, असे कळकुंबे यांनी आश्वासन दिले.latest news

 

यावेळी दिशा संस्थेचे डॉ. आय.एस. पटेकर, एंजल पिस फाऊंडेशनचे प्रा. कांतीलाल पाटोळे, रूग्णमित्र नादिर खान, हरदिन मॉर्निंग ग्रुप भिंगारचे संजय सपकाळ, डॉन बॉस्को ग्रामीण विकास केंद्र केडगावचे बाळासाहेब गायकवाड, बोल फाऊंडेशनचे जोसेफ पाटोळे, श्री अमृतवहिनी मानवसेवा प्रकल्पाच्या वैष्णवी मेडे व गायत्री बढदे, जिल्हा रुग्णालयाचे सतिश आहिरे, क्रांती फाऊंडेशनचे प्रा.डॉ.अशोक घोरपडे, स्नेहबंध फाऊंडेशनचे डॉ. उद्धव शिंदे, काच, कचरा, पत्रा, कष्टकरी कामगार पंचायतचे विकास उडाणशिवे, डेझ फाऊंडेशनचे सत्यशील शिंदे, रोटरी इव्हॅनजलिन मंशाच्या मर्लिन एलिशा, पीस फाऊंडेशनचे सॅम्युअल वाघमारे, सावलीचे अजिंक्य आंधळे, कॅटालिस्टस सोशल ॲक्शनचे विक्रम कानवडे, सोशल वर्कर फारुक शेख, महिला बचतगट प्रमुख फरिदा शेख, नवजीवन प्रतिष्ठानचे संदीप पडवळ, संगीता पवार, उर्जिता सोशल फाउंडेशनच्या संध्या मेढे, IRDC चे गोरख धात्रक, उमेद सोशल फाउंडेशनचे सचिन साळवी, हरियालीचे सुरेश खामकर, शीतल शिंदे, सत्वशिला वाघमारे, मालिका साबळे सहभागी होते.

 चर्चेचे समायोजन महानगर पालिकेच्या निवृत्त अधिकारी व कार्यकर्त्या नीलिमा जाधव बंडेलु यांनी केले. मेजर ज्योती कळकुंबे यांनी आभार मानले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी कॅप्टन सूरज वंजारे, ब्रदर प्रविण साबळे, ब्रदर अमित पठारे यांनी प्रयत्न केले.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

ahilyanagar news: अक्षयऋषीजी म.सा. यांनी दिला “आ अब लौट चले” चा 1 महत्वाचा विश्वसंदेश

श्रीगोंदा | ३ जानेवारी | माधव बनसुडे

(ahilyanagar news) ३१ डिसेंबर साजरा करुन आपण सर्व पाश्चात्य संस्कृतीचे आचरण करीत त्यांच्या चाली रुढीप्रमाणे वागून मांस, मद्य आदी सेवन करत नवीन वर्षाचे स्वागत करत आहोत. परंतु आपल्या जैन संस्कृतीत अशाप्रकारे मांस भक्षण करणे व मद्य पिणे हे निषिद्ध मानले आहे, असे मार्गदर्शन जैन संत अक्षय ऋषीजी म.सा. यांनी केले.

(ahilyanagar news)आचार्य सम्राट आनंदऋषीजी म.सा. यांचे सुशिष रत्न श्रमणसंघीय उपप्रवर्तक तपमहर्षी खानदेश शिरोमणी परमपूज्य गुरुदेव श्री अक्षय ऋषीजी म.सा, प. पु. अमृत ऋषीजी म.सा, अचल ऋषीजी म.सा व गीतार्थ ऋषीजी म.सा या चार संतांचे विचारण करत करत ता. २७ डिसेंबर रोजी श्रीगोंदा शहरात आगमन झाले.

(ahilyanagar news) यावेळी ते मार्गदर्शन करताना म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीचा पगडा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना आपण आपल्या मूळ संस्कृतीकडे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण “आ अब लोट चले” या टॅगलाईन अंतर्गत सर्व तरुण तरुणींना त्यांनी आपल्या संस्कृतीकडे वळण्याचा सल्ला दिला.

श्रीगोंदा सकल जैन संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराजांचा श्रीगोंदातील मुक्काम फक्त दोन दिवसाचा होता दरम्यान समोरून येत असलेलं नववर्षाचे आगमन हे संत समागमात व्हावे, अशी अशी इच्छा समस्त श्रीगोंदा सकल जैन संघाने महाराजांसमोर व्यक्त केली.
महाराजांनी विनंतीचा मान राखत श्रीगोंदा शहरातील भाविकांसाठी पाच दिवसांचे भव्य-दिव्य असे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणारे उपक्रम राबवित नववर्षाचे स्वागत केले.
यासंदर्भात माहिती देताना श्रीगोंदा सकल जैन संघाचे अध्यक्ष विजय बोरा यांनी सांगितले, महाराज साहेबांनी या पाच दिवसात तीन दिवशीय अखंड नवकार मंत्राचा जपाचे आयोजन केले होते. तसेच ३१ डिसेंबर रोजी एक “शाम गुरू के नाम” हा अनोखा कार्यक्रम राबवुन सर्व भाविकांकडून धर्म आराधना करून घेतली. तसेच एक जानेवारी नववर्षाचे आगमन हे १७५ भाविकांनी एकासण तप करीत स्वागत केले. याव्यतिरिक्त समाजातील वंचित अथवा गरजू व्यक्तींसाठी काही रक्कम तसेच जीवदया गोरक्षण संस्थेसाठी काही रक्कम जैन कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी एकत्रित केली. या रकमेचा विनियोग लवकरात लवकर करण्यात येईल असेही ते म्हणाले.
कार्यक्रमानंतर गुंदेचा परिवार (शिंदावाला) यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व उपक्रम सुरू असताना सर्व जैन सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

जैन संस्कृतीत होणाऱ्या पाश्चात्यांच्या आक्रमण म्हणजेच ३१ डिसेंबर यामुळे आपली तरुण पिढी बिघडत चालली आहे. खाणपाण, वेशभूषा टिकली तरच आपली संस्कृती टिकेल. जैन संस्कृतीनुसार आपण आचार पाळले पाहिजे. जैनधर्मियांनी विविध उपक्रम राबवुन नविन वर्षाचे केलेले स्वागत हा एक स्तुत्य आणि संस्कृतीला पोषक उपक्रम आहे.
– भुषण महाराज महापुरुष

 

हे हि वाचा :  श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

mumbai news: शिव उद्योग संघटनेचा स्थानिक उद्योजकांना सक्षम करण्यासाठी 1 मदतीचा हात

अधिक माहितीसाठी प्रकाश ओहळे  9702058930 यांच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई | ३ डिसेंबर | गुरुदत्त वाकदेकर

(mumbai news) महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिव उद्योग संघटना, शिव सहकार चॅरिटेबल ट्रस्ट वेब बिझीनेसच्या सहकार्याने, ‘माझा महाराष्ट्र’ नावाची महत्त्वाकांक्षी ई-कॉमर्स वेबसाइट सुरू करण्यात आली. या व्यासपीठाचे उद्दिष्ट छोटे उद्योजक, स्वयं-सहायता गट आणि महिला उद्योजकांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ज्यामुळे त्यांची विक्री आणि महसूल वाढेल.

mumbai news

(mumbai news) महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांना भेडसावणाऱ्या मर्यादित मार्केटिंग आणि प्रमोशन बजेटच्या दीर्घकालीन समस्येचे निराकरण करणे ही ‘माझा महाराष्ट्र’ची संकल्पना आहे. उच्च-गुणवत्तेची उत्पादने तयार करूनही, यापैकी बरेच उद्योजक विपणन आणि जाहिरातीसाठी निधीच्या कमतरतेमुळे व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करतात. ही तफावत भरून काढण्यासाठी ‘माझा महाराष्ट्र’ या उद्योजकांना त्यांची उत्पादने नाममात्र दरात सूचीबद्ध करण्यासाठी 1 व्यासपीठ अल्पदरात उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे त्यांना जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.

ई-कॉमर्स वेबसाइट स्थानिक उद्योजकांना अनेक फायदे प्रदान करेल. ज्यात – जागतिक दृश्यमानता, अल्प दरांच्या उत्पादनांची सूची, विक्री आणि महसूल वाढ, विस्तृत ग्राहक संपर्क, व्यवसाय वाढ आणि विस्तारासाठी संधी उपलब्ध होणार आहेत.
शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद म्हणाले, “आम्ही ‘माझा महाराष्ट्र’ द्वारे स्थानिक उद्योजकांना त्यांची उत्पादने जागतिक ग्राहकांपुढे पोहोचण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी उत्सुक आहोत. छोट्या उद्योजकांना सक्षम करणे आणि व्यवसायात वाढ आणि यश मिळविण्यासाठी मदत करणे हे आमचे ध्येय आहे.”
उत्पादनांची नोंदणी करण्यासाठी आणि ‘माझा महाराष्ट्र’ बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रकाश ओहळे यांच्याशी 9702058930 क्रमांकावर संपर्क साधू शकता. जागतिक व्याप्ती आणि प्रचंड लोकप्रियतेसह, ‘माझा महाराष्ट्र’ महाराष्ट्रातील स्थानिक उद्योजकांसाठी एक गेमचेंजर तसेच त्यांच्या व्यवसायांना पुढील स्तरावर नेण्यासाठी तयार आहे.
शिव उद्योग संघटनेबद्दल :
शिव उद्योग संघटना ही महाराष्ट्रात रोजगार आणि व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी स्थापन केलेली संघटना आहे. शिव सहकार चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने, संस्थेने स्थानिक उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी ‘माझा महाराष्ट्र’ ई-कॉमर्स वेबसाइट सुरू केली आहे.

हे ही वाचा : मराठी विश्वकोश येथे वाचा

Cultural Politics: 31 डिसेंबरला दारूच्या बाटल्या ‘रित्या’ करण्याऐवजी रक्ताच्या पिशव्या ‘भरु’ या – जाणीव फाउंडेशनचे आवाहन

जास्तीत जास्त युवकांनी रक्तदान करून गरीब व गरजू रुग्णांना मदत करावी

अहमदनगर | २६ डिसेंबर | प्रतिनिधी

(Cultural Politics) रुग्णांची वाढती गरज लक्षात घेऊन सालाबादाप्रमाणे यावर्षीही मंगळवारी ता.३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत जाणीव फाउंडेशन व जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दारूच्या बाटल्या रित्या करण्याऐवजी रक्ताच्या पिशव्या भरुया’ या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीर शंभूराजे चौक, प्रगती डेअरीसमोर, श्रीराम चौकाजवळ, सावेडी, अहमदनगर येथे होणार आहे.

(Cultural Politics) २०२४ या सरत्या वर्षात एक अधिकचे पुण्यकर्म आपल्या खात्यात जमा करण्याची सुवर्णसंधी समजून जास्तीत जास्त युवकांनी या शिबिरात रक्तदान करून गरीब व गरजू रुग्णांना मदत करावी. इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावे, रक्तदान हे जीवनदान असते, असे आवाहन जाणीव फाउंडेशन यांनी केले.

विशेष म्हणजे सर्व रक्तदात्यांना आकर्षक जीवनोपयोगी भेटवस्तू दिली जाणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी नेहमीप्रमाणे रक्तदान करुन पुण्यकर्मात सहभागी होऊन रुग्णसेवा करण्याच्या अनोख्या संधीचा लाभ घ्यावा. फाउंडेशनचे सर्व सदस्य वर्षातून किमान ३ वेळा तरी मोठ्या आनंदाने रक्तदान करतात. पुण्यशील उपक्रमासाठी सर्वांनी रक्तदान करून आपले अमूल्य योगदान द्यावे, असे आवाहन जाणीव फाउंडेशनच्यावतीने संपादक संदिप रोडे, छायाचित्रकार राहुल जोशी, ॲड.विक्रम वाडेकर, बांधकाम व्यावसायिक प्रदीप वाखुरे, इंजि. बाळासाहेब पवार, बांधकाम व्यावसायिक शंतनु पांडव, विमा सल्लागार राहुल काळे, कर सल्लागार विकास जोशी, सुवर्णकार महेंद्र नांदुरकर, प्रगतीशील शेतकरी शिवशर्मा चेमटे, बांधकाम व्यावसायिक सचिन निक्रड, सुभाष बांगर, दीपक भंडारी, सतिश शिंदे, विकास गायकवाड, अतुल इथापे, आशिष वेळापुरे, संजय माने, कैलाश गाडे, गणेश कानवडे, अजय पवार, सतीश इंगळे व इंजिनीअर तथा ॲड. कैलाश दिघे आदींनी केले.Cultural Politics

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Education: पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी राम साठे यांनी 150 विद्यार्थ्यांना दिले ‘घनकचरा व्यावस्थापन’चे धडे

जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमवेत घेतली ‘माझी वसुंधरा’ शपथ

अहमदनगर | २६ डिसेंबर | प्रतिनिधी

(Education) शहरातील रेल्वेस्टेशन येथील अहमदनगर महानगरपालिकेच्या ISO 9001:2015 प्रमाणित डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय जुनी मनपा शाळा क्र.४ मध्ये पिंपरी चिंचवड मनपा घनकचरा विभाग अधिकारी राम साठे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अहमदनगर मनपाच्या वतीने आयोजित जनजागृती कार्यक्रमात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कचऱ्याचे विविध प्रकार व कचरा कशाप्रकारे विलगीकरण केला जातो. त्याचप्रमाणे कचरा वेगवेगळा कसा ठेवायचा. त्याची साठवणूक कशी करायची आणि कचरागाडीपर्यंत कसा पोहोचवायचा याबाबत मार्गदर्शन केले. कचऱ्यापासून काय काय तयार करता येते, याचीही विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांसमवेत ‘माझी वसुंधरा’ शपथ घेण्यात आली.Education

(Education) यावेळी मनपातील घनकचरा विभागाचे घोरपडे, शुभम पाटील, सुदर्शन अंधारे, ऋषिकेश लांडगे आणि अभिषेक उमाप यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका मनिषा गिरमकर, विठ्ठल आठरे, मेघना गावडे, शबनम खान आदींसह स्थानिक नागरिक, पालक उपस्थित होते.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा