democracy

democracy: अहिल्यानगरमध्ये 26 ते 30 जानेवारी दरम्यान ‘लोकशाही उत्सव’

अहमदनगर | २२ जानेवारी | प्रतिनिधी

(democracy) आपला प्रिय भारत देश संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारताच्या लोकशाहीपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. राजकीय व  व्यावहारिक पातळीवर अनेक अंगाने लोकशाहीला कमजोर करण्याचे काम सुरु आहे. देशपातळीवर राजकीय अंगाने भांडवलदारी व्यवस्थेचे उदात्तीकरण सुरु आहे. अशावेळी हुकुमशाही, राजेशाही व्यवस्थेला नाकारणारी व सर्वहारा वर्गाला समता, बंधुता आणि सामाजिक न्याय देण्यास कटिबद्ध असलेली लोकशाही टिकली पाहिजे व ती तळागाळात झिरपली पाहिजे हा हेतू समोर ठेऊन अहिल्यानगरमध्ये सन २०२२ पासून लोकशाही उत्सवाला सुरुवात झाली. शहरातील वेगवेगळ्या पुरोगामी व समविचारी संघटनांनी एकत्रित येऊन हा उत्सव सुरू केला. या वर्षी ता. २५ ते ३० जानेवारी २०२५ या दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे यांनी दिली.Democracy

हे ही पहा : समतेची गाणी, #लोकशाही उत्सव – २०२४ #अहमदनगर #live on #रयत समाचार

(democracy) हा लोकशाही उत्सव दरवर्षी  प्रजासत्ताक दिन ते महात्मा गांधी हौतात्म्य दिन या दरम्यान आयोजित करण्यात येतो. यावर्षी २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता विद्या कॉलनी, कल्याण रोड येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ता.२६ जानेवारी रोजी प्रसिद्ध वास्तवपटकार वरुण सुखराज यांच्या ‘टू मच डेमॉक्रसी’ या शेतकरी आंदोलनाच्या वास्तवपटाचे प्रदर्शन व चर्चेचे आयोजन शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे, ता. पारनेरला करण्यात आले. तर ता. २७ व २८ जानेवारीला डॉ. प्रशांत शिंदे, अशोक सब्बन व डॉ. बापू चंदनशिवे हे वेगवेगळ्या महाविद्यालयात जाऊन लोकशाहीवर व्याख्याने देणार आहेत.

(democracy) ता. २९ जानेवारीला अहिल्यानगरमध्ये शिवाजी नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाचा प्रचार प्रसार करणारे पथनाट्याचे सादरीकरण होणार आहे. तर ३० जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता रावसाहेब पटवर्धन स्मारक, सावेडी येथे प्रा. सुभाष वारे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम व ख्यातनाम ऊर्दू कवयित्री डॉ. कमर सुरूर यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात प्रतिभा अहिरे (कन्नड), मुसेब आझमी (आझमगढ, उत्तर प्रदेश), नोमान सिद्दीकी (गोरखपूर, उत्तर प्रदेश), प्रकाश घोडके (पुणे) आणि बिलाल अहेमदनगरी सहभागी होणार असल्याची माहिती लोकशाही उत्सवाच्या निमंत्रक सोनाली देवढे, संध्या मेढे, ॲड. विद्या जाधव, प्रमिला कार्ले, सुरेखा आडम आणि समृद्धी वाकळे यांनी दिली. या सर्व उपक्रमात लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खजिनदार अशोक सब्बन यांनी केले.democracy

हे हि वाचा : गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी

health

health: मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770

मुंबई | २१ जानेवारी | प्रतिनिधी

(health) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच आवाहन केले आहे की, मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्यावे. पुढाकार घेऊन अवयवदान करावे. त्यासाठी काही अर्ज भरून ठेवायचे आहेत. अवयवदानाची अधिक माहिती व नोंदणी करण्याकरिता notto.abdm.gov.in संकेतस्थळाला भेट देण्याचे संबंधित विभागाने सुचविले आहे. तसेच या Toll-Free Number: 1800-11-4770 क्रमांकावर संपर्क साधावा.

हे ही वाचा : history: खोटारडेपणा किती? ‘लोकसत्ता’चा पोस्टमार्टेम !

राज की बात

latest news: विद्यार्थ्यांनो, 12 वीचे (HSC) प्रवेशपत्र डाऊनलोड करू घ्या !

मुंबई | ११ जानेवारी | प्रतिनिधी

(latest news) १२ वी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेची (HSC) ऑनलाईन प्रवेशपत्र मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली.latest news

social: अंजनाबाई चव्हाण स्मृतीप्रित्यर्थ 5 झाडे लावून ‘फळझाडे लागवडीसह संवर्धनाचा निर्धार’

अहमदनगर | १० डिसेंबर | प्रतिनिधी

(social) आत्मनिर्धार स्वयंसहाय्यता बचतगटाच्या ज्येष्ठ सदस्या अंजनाबाई भागवत चव्हाण यांचे वृद्धापकाळाने बुधवारी ता.१ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी आज शुक्रवारी ता. १० रोजी  इसळक येथे पार पडला. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य निवर्तल्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फळझाडे लावून आणि  झाडांच्या संवर्धनाचा निर्धार करून कृतिशील श्रद्धांजली अर्पण करण्याचा नवा पायंडा चव्हाण कुटुंबीयांनी पाडला. हा उपक्रम समाजाला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. सिद्धिनाथ मेटे महाराज यांनी केले. चव्हाण यांच्या दशक्रियाविधीच्या प्रवचनसेवेत ते बोलत होते.

(social) आत्मनिर्धार फाउंडेशन संचालित पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने आगामी काळात फळझाडे, औषधी वनस्पतींची लागवड आणि संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्या उपक्रमाचा शुभारंभ यानिमित्ताने करण्यात आला. इसळक येथील चव्हाण कुटुंबियांच्या मदतीने या उपक्रमास चालना मिळाली असल्याची माहिती आत्मनिर्धार फाउंडेशनचे महादेव गवळी यांनी दिली.

झाडांची लागवड आणि संवर्धन ही लोकचळवळ व्हावी, त्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक रामदास कोतकर यांनी केले.

(social) यावेळी निंबळक सोसायटीचे चेअरमन भाऊराव गायकवाड, लेखक सचिन चोभे, बाळासाहेब खपके, घनश्याम म्हस्के, पोपटराव गाडगे, संजय म्हस्के आदी मान्यवर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक परिवार उपस्थित होता.
पर्यावरण संवर्धन समितीचे संदीप गेरंगे, ॲड. राहुल ठाणगे, आसाराम लोंढे, राजेंद्र खुंटाळे महेश चव्हाण, विकास चव्हाण, रोहित चव्हाण आदींनी परिश्रम घेतल्याने हा उपक्रम यशस्वी झाला.
social
आत्मनिर्धार स्वयंसहाय्यता बचतगटाच्या ज्येष्ठ सदस्या दिवंगत अंजनाबाई भागवत चव्हाण
अंजनाबाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृती चिरकाल स्मरणात राहाव्यात, त्यांनी दिलेल्या परोपकाराची शिकवणीचे अनुकरण करताना चव्हाण कुटुंबीयांनी श्री क्षेत्र लिंगतीर्थ इसळक येथे ५ झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यासाठी झाडांचे पालकत्व घेण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती किरण चव्हाण यांनी दिली. दशक्रिया विधी दरम्यान उपस्थितांच्या हस्ते पेरू, आवळा, चिंच, उंबर, पिंपळ आणि जांभुळाच्या रोपांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

 

हे हि वाचा :  द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर

latest news: युवा दिनानिमित्त 12 जानेवारीला जिजाऊ महोत्सवाचे आयोजन

अहमदनगर | ९ जानेवारी | प्रतिनिधी

(latest news) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनानिमित्त रविवारी ता. १२ जानेवारी रोजी केडगाव येथे जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड यांनी दिली.

जिजाऊ महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक किसन सातपुते यांची निवड करण्यात आली.

(latest news) १२ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून युवक – तरुणांना प्रेरणा देण्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, राज्य पुरस्कारप्राप्त लेखक नितीन थोरात, लेखक देवा झिंजाड, उद्योजक राजेंद्र शिंदे हे मार्गदर्शन करणार असून पद्मश्री पोपट पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख सचिन चोभे यांनी दिली.

 रविवार ता. १२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. मार्गदर्शनपर व्याख्यान सुरू होईल. तरी अधिकाधिक युवक, तरुण आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन महादेव गवळी यांनी केले.

latest news

हे हि वाचा : द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर