श्रीगोंदा | ३ जानेवारी | माधव बनसुडे
(ahilyanagar news) ३१ डिसेंबर साजरा करुन आपण सर्व पाश्चात्य संस्कृतीचे आचरण करीत त्यांच्या चाली रुढीप्रमाणे वागून मांस, मद्य आदी सेवन करत नवीन वर्षाचे स्वागत करत आहोत. परंतु आपल्या जैन संस्कृतीत अशाप्रकारे मांस भक्षण करणे व मद्य पिणे हे निषिद्ध मानले आहे, असे मार्गदर्शन जैन संत अक्षय ऋषीजी म.सा. यांनी केले.
(ahilyanagar news)आचार्य सम्राट आनंदऋषीजी म.सा. यांचे सुशिष रत्न श्रमणसंघीय उपप्रवर्तक तपमहर्षी खानदेश शिरोमणी परमपूज्य गुरुदेव श्री अक्षय ऋषीजी म.सा, प. पु. अमृत ऋषीजी म.सा, अचल ऋषीजी म.सा व गीतार्थ ऋषीजी म.सा या चार संतांचे विचारण करत करत ता. २७ डिसेंबर रोजी श्रीगोंदा शहरात आगमन झाले.
(ahilyanagar news) यावेळी ते मार्गदर्शन करताना म्हणाले, पाश्चात्य संस्कृतीचा पगडा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना आपण आपल्या मूळ संस्कृतीकडे जाणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण “आ अब लोट चले” या टॅगलाईन अंतर्गत सर्व तरुण तरुणींना त्यांनी आपल्या संस्कृतीकडे वळण्याचा सल्ला दिला.
श्रीगोंदा सकल जैन संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराजांचा श्रीगोंदातील मुक्काम फक्त दोन दिवसाचा होता दरम्यान समोरून येत असलेलं नववर्षाचे आगमन हे संत समागमात व्हावे, अशी अशी इच्छा समस्त श्रीगोंदा सकल जैन संघाने महाराजांसमोर व्यक्त केली.
महाराजांनी विनंतीचा मान राखत श्रीगोंदा शहरातील भाविकांसाठी पाच दिवसांचे भव्य-दिव्य असे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणारे उपक्रम राबवित नववर्षाचे स्वागत केले.
यासंदर्भात माहिती देताना श्रीगोंदा सकल जैन संघाचे अध्यक्ष विजय बोरा यांनी सांगितले, महाराज साहेबांनी या पाच दिवसात तीन दिवशीय अखंड नवकार मंत्राचा जपाचे आयोजन केले होते. तसेच ३१ डिसेंबर रोजी एक “शाम गुरू के नाम” हा अनोखा कार्यक्रम राबवुन सर्व भाविकांकडून धर्म आराधना करून घेतली. तसेच एक जानेवारी नववर्षाचे आगमन हे १७५ भाविकांनी एकासण तप करीत स्वागत केले. याव्यतिरिक्त समाजातील वंचित अथवा गरजू व्यक्तींसाठी काही रक्कम तसेच जीवदया गोरक्षण संस्थेसाठी काही रक्कम जैन कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी एकत्रित केली. या रकमेचा विनियोग लवकरात लवकर करण्यात येईल असेही ते म्हणाले.
कार्यक्रमानंतर गुंदेचा परिवार (शिंदावाला) यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व उपक्रम सुरू असताना सर्व जैन सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
जैन संस्कृतीत होणाऱ्या पाश्चात्यांच्या आक्रमण म्हणजेच ३१ डिसेंबर यामुळे आपली तरुण पिढी बिघडत चालली आहे. खाणपाण, वेशभूषा टिकली तरच आपली संस्कृती टिकेल. जैन संस्कृतीनुसार आपण आचार पाळले पाहिजे. जैनधर्मियांनी विविध उपक्रम राबवुन नविन वर्षाचे केलेले स्वागत हा एक स्तुत्य आणि संस्कृतीला पोषक उपक्रम आहे.
– भुषण महाराज महापुरुष
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा