शिर्डी विमानतळ येथे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी केले स्वागत
अहमदनगर | २३ डिसेंबर | प्रतिनिधी
(Cultural Politics) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विखे पाटील फाऊंडेशन वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे काल ता.२२ रोजी आगमन झाले. त्यांच्या समवेत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे होते. जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. हे सर्वजण पोपट पवार या समाजसेवकाच्या मुलाच्या लग्नासाठी आले होते.
(Cultural Politics) भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. अण्णा हजारे यांना समाजसेवेसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी आ.संग्राम जगताप, आ.शिवाजी कर्डिले, आ.काशिनाथ दाते, बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी मुख्यमंत्री महोदयांच्या शिर्डी विमानतळ येथे आगमन झाले. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी त्यांचे स्वागत केले.
Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?