Ahilyanagar News: शहर जिल्हाध्यक्षपदी गोपाल वर्मा यांचे नाव चर्चेत - Rayat Samachar
Ad image

Ahilyanagar News: शहर जिल्हाध्यक्षपदी गोपाल वर्मा यांचे नाव चर्चेत

गोपाळ वर्मा यांना अहमदनगर कॉलेज माजी विद्यार्थ्यांचा पाठिंबा

अहमदनगर | १ डिसेंबर | प्रतिनिधी

Ahilyanagar News शहरातील युवा नेतृत्व, सुवर्णकार समाजातील उदयोन्मुख उद्योजक तथा विद्यमान भाजपाचे सहचिटणीस गोपाल वर्मा यांचे नाव शहर जिल्हाध्यक्षपदी चर्चेत आहे.

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होत असल्याने तत्पूर्वी जिल्ह्यापासून राज्यपातळीवरील सर्व निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. Ahilyanagar News अहिल्यानगर जिल्ह्यात देखील भाजपचे जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. जिल्हा व राज्याची निवडणूक पार पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात येते.

सध्या शहर जिल्हाध्यक्षपदासाठी गोपाल वर्मा, सचिन पारखी, धनंजय जाधव, अर्बन बँकेचे भाग्यविधाते सुवेंद्र गांधी, बाबा सानप, अर्बन बँक बंद पडत्यावेळेचे माजी संचालक भैय्या गंधे, माजी नगरसेवक मिलिंद गंधे, बंजरंग शाळेचे नितीन शेलार, माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, रामदास आंधळे, करण कराळे, तुषार पोटे, राजाभाऊ सातपुते आदी नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये गोपाळ वर्मा यांचे नाव आघाडीवर असून कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
गोपाल वर्मा हे मागील १५ वर्षांपासून पक्षाचे एकनिष्ठतेने काम करीत आहेत. प्रधानमंत्री मोदी यांच्या महत्वकांक्षी कार्यापैकी एक असलेल्या ‘मन की बात’चे ते सहसंयोजक म्हणून जनते पर्यंत पोहचले आहेत. नमो ऐपच्या माध्यमातून लोकांना जोडणारे, ग्राउंड लेव्हलवर काम करणारे व सरकारची प्रत्येक योजना जनतेपर्यंत पोहचवून सदस्य नोंदणीसाठी सक्रीय काम करणारे गोपाळ वर्मा असल्याने वरिष्ठ नेते त्याच्या नावाला पसंती देतील, असे वाटते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे चांगले काम केले. त्यामुळे शहराध्यक्षाची संधी मिळू शकते. गोपाळ वर्मा यांना अहमदनगर कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेचा पाठिंबा आहे.

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment