सोनई | २१ नोव्हेंबर | विजय खंडागळे
Election २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी राजूर येथील रक्तनात्यातील भावजाई यांचा दशक्रिया विधी उरकून १३० किलोमिटर अंतरावर असलेल्या राजूर येथून मतदानासाठी आल्याची घटना घडली. सक्षम लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी मतदान करणे किती महत्वाचे आहे हे या घटनेतून दिसून आले. पत्रकार विजय खंडागळे यांच्या पत्नी अनिता खंडागळे यांच्या भावजयीचे निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी आणि मतदानाचा दिवस एकच आल्याने मतदानापासून वंचित राहू नये म्हणून व नातेवाईकांमध्ये पसरलेल्या दुःखाच्या प्रसंगी आपल्या नातेवाईकातून दुःख सावरून थेट १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूर येथून मतदानासाठी येऊन मतदानाचा हक्क बजावला. या प्रसंगाचं वर्णन करताना अनेक मतदार परदेशातून, राज्यातून, जिल्ह्यातून, आपला अमूल्य वेळ देऊन पवित्र मतदानाचे कार्य बजावले आहे.
पाच वर्षांतून एकदा नागरिकांना मतदानाचा हक्क मिळतो तो हक्क गमावू नये म्हणून आणि स्थानिक उमेदवार असल्याने दुःख सावरून मी मतदानाचा हक्क बजावला, असे अनिता खंडागळे यांनी सांगितले.