Election: मोकळ्या वातावरणात निवडणूक झाली नसेल तर, कोर्टात आव्हान दिले पाहिजे - विधीज्ञ असीम सरोदे - Rayat Samachar

Election: मोकळ्या वातावरणात निवडणूक झाली नसेल तर, कोर्टात आव्हान दिले पाहिजे – विधीज्ञ असीम सरोदे

रयत समाचार वृत्तसेवा
70 / 100

मुंबई | २४ नोव्हेंबर | प्रतिनिधी

Election महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागला. यात महायुतीला २३० जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला फक्त ४७ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला १४९ पैकी १३२ जागांवर विजय मिळाला. राज्यात महायुतीला ‘राक्षसी बहुमत’ मिळेल असे काही चित्र नव्हते, तरीही असा निकाल लागला, असे विधान विधीज्ञ असीम सरोदे यांनी केले. या निकालाविरोधात आपण कोर्टात आव्हान देणार आहोत, असे असीम सरोदे म्हणाले.

एका मराठी वृत्तवाहिनीशी सरोदे संवाद साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी सरोदे म्हणाले, हा निकाल पूर्ण अनाकलनीय आणि अविश्वसनीय अशा स्वरुपाचा आहे. महाराष्ट्रातील लोक “एवढे राक्षसी बहुमताचे चित्र नव्हते” असे बोलत आहेत तरीसुद्धा मते मिळाली आहेत, त्यामुळेच अविश्वसनीय आहेत.

आपण कोणाला मतदान करतोय आणि ते मत कोणाला जातेय याबाबत लोक यावर संशय व्यक्त करीत आहेत. याविषयी कोर्ट कायदेशीर बाबी तपासू शकते. पण तांत्रिक बाजू आहे, त्यातल्या अनेक गोष्टी सिद्ध होऊ शकत नाही. त्याचा गैरफायदा राजकीय पक्षांनी घाऊक पद्धतीने घ्यायचा आणि कुठलीही लाट नसताना बहुमत मिळवायचे या शंकांना वाट करून देण्यासाठी अनेकांनी कोर्टात जायचा निर्णय घेतला आहे, असे सरोदे यांनी सांगितले.

VIRAJ TRAVELS
Ad image

अनेक पराभूत उमेदवारांनी मला संपर्क केला असून त्यांनी या निवडणुकीला कोर्टात आव्हान देण्याचे सांगितले. प्रत्येकाचे आक्षेप पाहून आम्ही स्वतंत्र याचिका दाखल करू. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रत्येक पराभूत उमदेवाराने कोर्टात याचिका दाखल करावी. निवडणुकीतली संपूर्ण प्रक्रिया शंकास्पद आहे हे सामान्यातला सामान्य माणूस बोलतोय. त्यामुळे कोर्टात याबद्दल दाद मागितली पाहिजे. मोकळ्या वातावरणात जर निवडणूक झाली नसेल तर कोर्टात याबाबत आव्हान दिले पाहिजे, असेही आवाहन सरोदे यांनी केले.

Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?

Share This Article
Leave a comment