Cultural Politics: हिंदुत्ववाद्यांनी मतदान करायचे कोणाला ? कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार उत्कर्ष गिते यांचा सवाल - Rayat Samachar

Cultural Politics: हिंदुत्ववाद्यांनी मतदान करायचे कोणाला ? कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार उत्कर्ष गिते यांचा सवाल

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read
70 / 100

अहमदनगर | १८ नोव्हेंबर | प्रतिनिधी

Cultural Politics हिंदुत्ववाद्यांनी मतदान करायचे कोणाला ? असा खडा सवाल कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार उत्कर्ष गिते यांनी केला आहे. अहमदनगर शहर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या मनोगतात ते म्हणतात, अहिल्यानगरमध्ये कित्येक हिंदु नागरिक आहेत ज्यांचा भारतीय जनता पार्टी व वैचारिक बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यावर विश्वास आहे. परंतु आज महायुतीच्या ‘माया’जालामधून ते घड्याळाला मतदान करून पाहत आहेत. त्यांनी हा विचार करणे गरजेचे आहे की, जर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या निकालानंतर युतीत सरकार न करता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात ‘घर वापसी’ केल्यानंतर त्यांच्या पक्षातल्या आमदारांची हिंदुत्वाप्रति काय भूमिका असेल? आज अवघ्या भारताला हिंदू रक्षणाची गरज आहे त्या संदर्भात कोणी काम करताना दिसत नाही. त्यात विकासाची भुरळ घालून व महायुतीची झालर घेऊन जर आपण हिंदुत्ववाद्यांकडून मतदान अपेक्षित करत असाल तर भविष्यात अहिल्यानगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील उमेदवार हे हिंदुत्वासाठी काय काम करतील त्यांनी जाहीर करावे. अहिल्यानगरचे नाव पुन्हा बदलून अहमदनगर व्हायला हवं व अहिल्यानगर जे झालं ते योग्य आहे याच्यावर भूमिका त्यांनी मांडावी.

ते पुढे म्हणाले, अहिल्यानगरमध्ये कित्येक ठिकाणी कत्तलखाने व ठिकठिकाणी होत असलेल्या लवजिहादवर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. वक्फ बोर्ड रद्द व्हायला हवा की नाही? अहिल्यानगरकरांना दिवसाला पाच वेळेस होत असलेला त्रास म्हणजेच मशिदीवरील भोंग्यांचा त्रास या त्रासाला संपुष्टात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार काय पाऊल उचलणार? एमजी रोड अतिक्रमणावर त्यांची काय भुमिका आहे ? हे त्यांनी आधी स्पष्ट करावे.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसगटाचे नेते छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमा दरम्यान “ईडीची भीती दाखवत आम्हाला मजबूर केले” जात असल्याचा दावा केलेला आहे. हाच संकेत भविष्यात महायुती टिकणार नाही हे समजण्यासाठी पुरेसा आहे. तसा असेल तर अहिल्यानगरमधल्या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदेगटाच्या कार्यकर्त्यांनी व वरिष्ठ हिंदुत्ववाद्यांनी एकदा पुन्हा विचार करून आपली ताकद योग्य पर्यायाच्या मागे लावून अहिल्यानगर वाचवून भविष्य सुरक्षित करण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. भाजपने विरोध करूनही जर अजित पवार यांनी नवाब मलिक यांस उमेदवारी देऊन त्यांच्या प्रचारास जात असतील तर याची काय शाश्वती आहे की हिंदूंवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अहिल्यानगरचा उमेदवार योग्य तो न्याय करेल. आज अहिल्यानगरमध्ये रस्ता, पाणी, वीज सोडून इतरही अनेक प्रश्न आहे ज्यांच्यावर कधीही कुठल्याही पक्षाचा माणूस बोलताना सहजासहजी दिसत नाही. व्यापारी त्यांचे उद्योग करून पोट भरतात त्यांनाही धर्माची व संस्कृतीची हवी सुरक्षा आहे. त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार अजित पवार गटाचे संग्राम जगताप व शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे काय पाऊल उचलतील ? हे लक्षात घ्यायला हवे.
हिंदूंसाठी काय काम करतील या दृष्टिकोनातून एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांचं मत मांडणे गरजेचे आहे. विकास पण नेमकं कसला वा कोणाचा ? सर्वसामान्य हिंदू जनतेचा की निवडणुकीच्या काळात एकगठ्ठा मतदान करणारे भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे बहुजन, स्वतःला अल्पसंख्याक म्हणणारे मुसलमान बांधव यांचा? असा सवाल अहमदनगर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्कर्ष राजेंद्र गिते यांनी केला आहे.
Cultural Politics
साभार – ऋषिकेश श्रीकांत वैद्य

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment