Sports: आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविले विजेतेपद; मुलांमध्ये आठरे पाटील विरुध्द आर्मी स्कूल (एसी सेंटर) मध्ये रंगणार अंतिम सामना - Rayat Samachar

Sports: आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने पटकाविले विजेतेपद; मुलांमध्ये आठरे पाटील विरुध्द आर्मी स्कूल (एसी सेंटर) मध्ये रंगणार अंतिम सामना

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
59 / 100

अहमदनगर| प्रतिनिधी | १६ नोव्हेंबर २०२४

 

Sports शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे स्टेअर्स फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर शालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल संघाने विजेतेपद पटकाविले. तर मुलांमध्ये 17 व 14 वर्ष या दोन्ही वयोगटात आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल (एसी सेंटर) यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.

17 वर्षा आतील मुलींचा अंतिम सामना श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल विरुध्द कर्नल परब स्कूल यांच्यात रंगला होता. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने पहिला हाफ मध्ये कोणाकडूनही गोल झाला नाही. दुसऱ्या हाफ मध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने आक्रमक खेळी केली. यामध्ये शेवटच्या क्षणी निकिता रमावत हिने 1 गोल करुन 1-0 गोलने श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाला विजय मिळवून दिला. मुलींमध्ये तिसऱ्या स्थानावर आर्मी पब्लिक स्कूलचा संघ राहिला. तर 17 वर्षा आतील मुलांमध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने तिसरे स्थान मिळवले आहे. स्पर्धेचे पंच म्हणून सागर चेमटे, शशी गायकवाड, जोएल पिल्ले, ओम दंडवते, परेश म्याना, प्रणव पंडित, ऋषी कनोजिया काम पाहिले.

Share This Article
Leave a comment