Politics: अंजूम शेख यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन; विधानसभेत हेमंत ओगले यांना साथ देण्याचा निर्णय - Rayat Samachar

Politics: अंजूम शेख यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन; विधानसभेत हेमंत ओगले यांना साथ देण्याचा निर्णय

रयत समाचार वृत्तसेवा
67 / 100

श्रीरामपूर |८ नोव्हेंबर | सलीमखान पठाण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शहरात घडलेल्या एका मोठ्या Politics  घडामोडीत नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष हाजी अंजुमभाई यांनी विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार हेमंत ओगले यांना आपला पाठिंबा देत यापुढे काँग्रेस पक्षाचे सक्रिय काम करण्याचा निर्णय जाहीर केला. अंजूम शेख गटाच्या या निर्णयामुळे हेमंत ओगले यांचे पारडे जड झाले.

काल सकाळी शेख यांच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक कार्यकर्ते तसेच काँग्रेस पक्षाचे उमेदवार हेमंत ओगले माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, संजय फंड, बाबासाहेब दिघे, आशिष धनवटे, श्रीनिवास बिहानी, अशोक उपाध्ये, माऊली मुरकुटे, दिलीप नागरे, दिलीप सानप, शाम अडागळे, मुन्ना पठाण, कलीम कुरेशी, रज्जाक पठाण, रियाज पठाण, प्रकाश खोले, किशोर शिंदे, जलालुद्दीन पीरजादे आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जलीलखान पठाण हे होते. यावेळी बोलताना पठाण यांनी माजी आमदार जयंत ससाणे यांच्या अचानक जाण्याने संघटनेचे मोठे नुकसान झाले. दरम्यानच्या काळात झालेल्या मतभेदांमुळे संघटनेचे दोन गट झाले त्यामुळे सर्वांचीच नुकसान झाले संघटनेची ताकद खूप महत्त्वाची असते त्यामुळे सर्वांनी पुढील काळामध्ये एक होऊन काम करावे असे आवाहन केले जयंत ससाणे यांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले.

माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी याप्रसंगी बोलताना, आजचा निर्णय हा सर्व काँग्रेस जणांसाठी अतिशय आनंदाचा असून झाले गेले सर्व विसरून अंजुमभाई व त्यांचे सर्व सहकारी हे परत आलेले आहेत सर्वांना कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता समान वागणूक देण्यात येईल आपण सर्वांनी एकत्र यावं ही सर्वांचीच इच्छा होती. नाही तर मी तुला संपवतो, तू मला संपव असे करत करत आपण सगळे संपू,असे सांगत राजकारण हे चालू राहील,परंतु श्रीरामपूर शहर हे एक धर्मनिरपेक्ष शहर आहे.या शहरात शांतता टिकली पाहीजे. यापूर्वी काय झाले हे एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे आपण सगळे विसरून जाऊ, असे ही ते म्हणाले.

माजी उपनगराध्यक्ष अंजुम भाई शेख यांनी यावेळी बोलतांना २०१६ पासून झालेल्या सर्व घटना कर्माचा सविस्तर आढावा घेतला. ज्या वेळी कै. जयंतराव ससाणे साहेब आजारी होते तेव्हा मी त्यांना भेटण्यास गेलो असता त्यांनी मला सांगितले अंजूम झाले गेले विसरून जा मी सुद्धा सर्व विसरतो सर्व पुन्हा एक होऊन काम करा या प्रकारचे त्यांनी मला सांगितले होते त्यानंतर आम्ही सातत्याने काँग्रेस पक्ष सोबतच राहिलो कधीही आम्ही ससाणे साहेब किंवा काँग्रेस पक्षावर टीका केली नाही. श्रीरामपूर शहराची बाजारपेठ आणि शहरातील सलोखा टिकविण्यासाठी सर्वांनी एक होऊन काम करण्याची आवश्यकता होती काँग्रेस पक्षाचे पाईक असल्यामुळे आम्ही मागील सर्व काही विसरून नव्या जोमाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे पुढील काळामध्ये करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे काम करू असे सांगितले.

याप्रसंगी बोलताना अशोक उपाध्ये यांनी शहरातील सर्व काँग्रेसप्रेमींनी एक होऊन काम करण्याची गरज होती कारण शहरांमध्ये जातीवादी शक्ती डोके वर काढत होत्या त्यांना तोंड देण्यासाठी ससाणे साहेबांची यंत्रणा ही एकत्रितपणे काम करणे गरजेचे होते आज या मनोमिलनामुळे सर्व काँग्रेस जरी झाले असून पूर्वीसारखे श्रीरामपूरचे वैभव परत आणण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे असे सांगत शहरांमधील गेल्या दोन वर्षात घडलेल्या घटनांचा खरपूस समाचार घेतला त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.

जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी जलील भाई आणि अंजुम भाई यांच्या काँग्रेस पक्षातील योगदानाचा उल्लेख करीत ससाने साहेबांसाठी सर्वाधिक कार्य करणारे कुटुंबासह मध्ये जरी झाले तरी मी सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आज सर्वजणी झाल्याने हेमंत ओगले यांचा विजय निश्चित झाला आहे असे सांगितले. एवढी माजी नगराध्यक्ष संजय फंड व माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी यांनीही मनोगत व्यक्त केले .

शेख कुटुंबीयांच्या वतीने यावेळी उमेदवार हेमंत ओगले व करण ससाणे यांचा जलीलभाई पठाण व एजाज शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास शहरातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्ते तसेच अंजुमभाई समर्थक वार्ड नंबर दोन मधील सर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment