चिंचवड | ७ नोव्हेंबर | प्रतिनिधी
Election खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद (रावण) यांच्या आझाद समाज पार्टीने चिंचवडचे स्वराज्य राष्ट्र निर्माण सेनेचे आमदारकीचे उमेदवार सतीश काळे यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यामुळे काळे यांची ताकद वाढणार आहे. आझाद पार्टीला मानणाऱ्या आंबेडकरी समुदायाची ताकद काळे यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. त्यामुळे काळे यांच्या गोटात आणखी ३० हजार मतांची भर पडणार आहे.
आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पार्टीचा देशभर विस्तार झाला. महाराष्ट्रात देखील पार्टीचे मोठे समर्थक आहेत. या पार्टीकडून चिंचवड विधानसभेबाबत आपली भूमिका जाहीर करण्यात आली. राज्याचे महासचिव ॲड. क्रांती सहाणे यांनी पत्र देऊन चिंचवड विधानसभेतील स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे उमेदवार सतीश काळे यांना Election पाठिंबा जाहीर केला.
पार्टीकडून देण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सतीश काळे गेल्या २५ वर्षापासून पिंपरी चिंचवड शहर तसेच महाराष्ट्रभर शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, मौलाना अबुल कलाम आझाद, यांच्या विचाराने समाज जोडण्याचे तसेच नवनिर्मितीचे काम करत आहेत. सर्व जातीधर्माच्या जनतेचे प्रश्न सुटावेत, यासाठी विविध आंदोलने करत आहेत. आपल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आझाद समाज पार्टीच्या वतीने २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघात जाहीर पाठींबा देत आहोत. तसेच सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की, सतीश भास्कर काळे यांना शिवणयंत्र या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन पक्षाचे वतीने करण्यात आले.
काळे यांना मिळणार ३० हजार मते.
पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर विचारांच्या अनुयायांचा आझाद समाज पार्टीला मोठा पाठिंबा आहे. तरुणांकडून विशेष पाठिंबा या पक्षाला मिळत आहे. चिंचवड विधानसभेत पक्षाचे सुमारे ३० हजार समर्थक मार्गदर्शक आहेत. या सर्वांची मतरूपाने ताकद सतीश काळे यांना मिळणार आहे. काळे यांनी मताची आघाडी घेतल्यास ते तगडा विरोधक ठरतील अशी चर्चा आहे.
गेल्या वीस वर्षांपेक्षा अधिक काळ पुरोगामी चळवळीत घालवला आहे. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मला यामध्ये पाठिंबा दिला आहे. आझाद समाज पार्टीने देखील पाठिंबा दिल्याने आणखीन ताकद वाढणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर, यांचे विचार घरोघरी पोहोचवण्याला बळ मिळणार आहे, असे सतीश काळे म्हणाले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
👌👌👌