Shivsena News नेवासा विधानसभा मतदार संघ हा भाजपाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटणार असल्याची शक्यता आहे.सकाल भाजपाची ९९ उमेदवाराची पहिली यादी जाहीर झाली. अहिल्यानगरमधील पाच उमेदवार जाहीर झाले असले तरी भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये नेवासाला स्थान मिळाले नाही. नेवासा मतदारसंघ भाजपाकडे असला तरी येथील उमेदवारी जाहीर झाली नसल्याने नेवासा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला सुटणार असल्याची माहिती वरिष्ठ पातळीवरील सूत्रांकडून समजते.
याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, शिवसेनेचे राज्यातील इतर पाच मतदार संघ भाजपाला सोडले गेले असल्याने नेवासा मतदार संघ हा हमखास शिवसेनेला सुटणार. नेवासा मतदार संघात अदलाबदल होऊन शिंदेसेनेकडून खूपटी येथील नामांकित उद्योजक आणि पंचगंगा शुगर फॅक्टरीचे प्रमुख प्रभाकर शिंदे पाटील यांची उमेदवारी फायनल झाली असल्याची माहिती Shivsena News वरिष्ठ पातळीवरील सूत्राकडून समजते.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक प्रभाकर शिंदे पाटील यांना विधानसभा निवडणूकीची तयारी करण्याबाबत शब्द दिला असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. काल वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी खूपटी येथे जंगी कार्यकर्ता मेळावा ठेवला होता. याला नेवासा तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिला.
यावेळी देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते त्यांना श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले, शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर माऊलीचा आशीर्वाद घेऊन काम केले आहे. गरजू लोकांना मदत करणे हीच खरी सेवा असल्याने त्यांनी पुढील काळात गोरगरीबाच्या सेवेचे कार्य करावे असा शुभाशीर्वाद दिला. यावेळी जंगले महाराज शास्त्री, रमेशानंदगिरी महाराज, जगताप महाराज चौधरी, ज्ञानेश्वर महाराज शिंदे सह राजकीय क्षेत्रातील भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, दादासाहेब होन, सरपंच भरत बेल्हेकर, दिनकर गर्जे, प्रताप चिंधे, आदिनाथ पटारे आणि पंचगंगा शुगर पॉवर, पंचगंगा सीड्सचे अधिकारी व कर्मचारी नेवासा मतदारसंघातून आलेले हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.