नवी दिल्ली | २० ऑक्टोबर | प्रतिनिधी
Bjp News नवी दिल्ली येथील केन्द्रीय कार्यालयाकडून महाराष्ट्र विधानसभेचे तिकिट वाटप जाहीर करण्यात आले असून आरएसएसबीजेपीने अहिल्यानगर जिल्ह्यात ओबीसींना वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
राष्ट्रीय महासचिव अरूण सिंह यांच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच प्रसिद्धी माध्यमांना Bjp News दिले आहे. यामधे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच जागांवर उमेदवार निश्चित केले असून त्यात शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव – मोनिका राजळे, राहुरी – शिवाजी कर्डिले, श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते, कर्जत जामखेड – राम शिंदे अशी यादीत नावे निश्चित केली आहेत. यामधे राम शिंदे सोडले तर सर्वच उमेदवार मराठा जातीचे असून अनेकजण घराणेशाहीचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत.
त्यामुळे आरएसएसबीजेचा खरा चेहरा उघड झाल्यासारखे दिसत आहे. सर्व निश्चित केलेल्या नावांवर नजर टाकली तर लक्षात येते की, राम शिंदे सोडले तर एकही उमेदवार मुळ आरएसएसबीजेपी विचारधारेचा नाही तर काँग्रेस सारख्या पक्षातून पुर्वीच आयात केलेेले दिसून येत आहेत. निष्ठावंतांवर पुन्हा सतरंज्या उचलण्याची वेळ येणार की काय अशी चर्चा निष्ठावंत स्वयंसेवकांमधे सुरू आहे.