सोनई | १७ ऑक्टोबर | विजय खंडागळे
Education सोनई येथील आदर्श विद्या मंदिर प्राथमिक शाळेत LKG, UKG व इयत्ता १ लीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या पालकांचा पालक संवाद मेळावा सोमवारी शाळेत पार पडला. मेळाव्यामध्ये LKG, UKG व इ.१ ली वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या पालकांनी मांडल्या. या सर्व प्रश्नांची उत्तरे शाळेचे मुख्याध्यापक दरंदले सर यांनी दिली.
दरंदले यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले, मुलाची काळजी कशी घ्यावी, मुलांना मोबाईल का देऊ नये, मुलांचा अभ्यास कसा आणि किती वेळ घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांचे वडील अभ्यास घ्यायला वेळ नसेल तर आईने अभ्यास घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे इमारतीचा पाया पक्का असेल तर इमारत मजबूतपणे टिकते त्याचप्रमाणे लहान वयात विद्यार्थ्याचा अभ्यास घेतला तर त्यांची गुणवत्ता वाढेल आणि मूले हुशार होतील. दररोज मुलांचा जास्तीत जास्त वेळ अभ्यास घेतला पाहिजे. शाळेत आज काय अभ्यास पूर्ण केला याची विचारपूस पालकांनी केली पाहिजे. आईने मुलांना शाळेत पाठविताना युनिफॉर्म घालून पाठवावे. पालकांनी मुलगा आजारी असेल तर शाळेत पाठवू नये, अशा अनेक लहान मोठ्या प्रश्नांची उत्तरे मुख्याध्यापकांनी पालक मेळावा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळवे मॅडम आणि बेल्हेकर मॅडम यांनी केले. मेळावासाठी ह.भ.प. सोमनाथ महाराज गडाख, ह.भ.प. निवृत्ती महाराज लांडे, प्रशांत गडाख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षिकांनी परिश्रम घेतले.