Ahmednagar News: महात्मा गांधींनी 'अहिंसा परमो धर्म'चा संदेश जगाला दिला - सैय्यद मतीन; चांद सुलताना हायस्कुलमध्ये गांधीजयंती साजरी - Rayat Samachar
Ad image

ahmednagar news: महात्मा गांधींनी ‘अहिंसा परमो धर्म’चा संदेश जगाला दिला – सैय्यद मतीन; चांद सुलताना हायस्कुलमध्ये गांधीजयंती साजरी

69 / 100

अहमदनगर | ६ ऑक्टोबर | आबिदखान दुलेखान

ahmednagar news राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी ‘अहिंसा परमो धर्म’ या तत्वाखाली देशवासियांना संघटित करून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. सत्य व अहिंसेच्या मार्गाने भारताला आत्मनिर्भर होण्याची दिशा दाखविली, असे प्रतिपादन ए. टी. यु. चांद सुलताना हायस्कुलचे अध्यक्ष सय्यद हाजी अब्दुल मतीन अब्दुल रहीम यांनी केले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

शहरातील ए.टी.यू. चाँद सुलताना एँग्लो उर्दू हायस्कुल अँण्ड ज्युनिअर कॉलेज येथे गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद असगर अकबर, सचिव शेख तन्वीर चांद, सदस्य शेख गुलाम दस्तगीर, अब्दुल गणी, शेख फय्याज, राज मोहम्मद, मुख्याध्यापक शेख अतिक कादर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या वक्तृत्वातून महात्मा गांधी यांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या घटनांवर प्रकाश टाकला. शादाब शेख यांनी आभार मानले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment