घोटण | १ ऑक्टोबर | शिवाजी घुगे
agriculture शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखानापरिक्षेत्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी २०२३-२४ मध्ये जे गाळप झाले, त्यामधील एक पेमेंट शेतकऱ्यांना दिले. तरीही सर्व शेतकऱ्यांची मागणी दिवाळीपूर्वी प्रति टन २०० रुपये प्रमाणे पेमेंट वितरित करावे. २०१४-२५ ला जे गाळप होणार आहे ते प्रति टन ३५०० रुपये याप्रमाणे जाहीर करावे, अशी मागणी गंगामाई कारखान्याचे अधिकारी मनाळ यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी घोटण गावचे माजी उपसरपंच राजेंद्र घुगे, भाजयुमोचे तालुका सरचिटणीस परमेश्वर थोरवे, भाजपा ओबीसी तालुका उपाध्यक्ष, नितीन आव्हाड, युवा उद्योजक हरी ढाकणे, महादेव मोटकर, अशोक नवले, अक्षय दौंड, रामकिसन थोरवे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मनाळ यांनी आश्वासन दिले की, या मागणीची मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य तो पर्याय निवडू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा