Cultural Politics: कष्टाचे फळ नेहमी मिळतेच - खा. निलेश लंके; इस्लामी भेटवस्तूचे अहमदनगरमधील एकमेव नाज कलेक्शनचे उद्घाटन संपन्न - Rayat Samachar
Ad image

Cultural Politics: कष्टाचे फळ नेहमी मिळतेच – खा. निलेश लंके; इस्लामी भेटवस्तूचे अहमदनगरमधील एकमेव नाज कलेक्शनचे उद्घाटन संपन्न

54 / 100

अहमदनगर | २५ सप्टेंबर | आबिदखान

Cultural Politics कोणताही व्यवसाय असो त्यासाठी सातत्य व कष्टाची अत्यंत आवश्यकता आहे. मन लावून कष्ट केल्यास यश नक्कीच प्राप्त होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाज कलेक्शन. त्यांनी छोट्याशा दुकानातून सुरू केलेला व्यवसाय त्यांच्या कष्टामुळे जिल्ह्यात नावाजलेले एकमेव दुकान झाले, असल्याचे प्रतिपादन खा. निलेश लंके यांनी केले.

तख्तीदरवाजा येथील नाज़ कलेक्शन दालनाचे नुतनीकरण आईसाहेब श्रीमती सलिमाबी सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, हाजी करीमसेठ हुंडेकरी, हाजी शौकत तांबोली, विक्रम राठोड, अशोक कानडे, तंन्जिमे उर्दु अदबचे अध्यक्ष सय्यद खलिल, भाजपाचे अलाउद्दीन काझी, डॉ. इस्लाम शेख, हाजी फारूक कमाल, भरत सूपेकर, शाहनवाज खान (टाईगर), एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, हाजी लियाकत हुसैन नजर हुसैन, सलिम खान गुलाब खान (सामाजिक कार्यकर्ता), पवन फिरोदिया, पवन नाईक,
राजु जाहगीरदार (खादीम मिरावली बाबा पहाड़), अनंत गारदे, सय्यद अजहर (अज्जू मेंबर), अब्दुल कादिर शेख, कासिम शेख, मोहम्मद हुसैन शेख, गुलाम मोहम्मद (पप्पू पटेल), अंजर अनवर खान, अजिम राजे, नदीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे खा. लंके म्हणाले, आज धार्मिकस्थळांना लोक मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात व तेथून आपल्या मित्रमंडळांना भेट देण्यासाठी भेटवस्तू आणत असतात. पण साधारण सर्वांना ते देऊ शकत नाही अशावेळी नाज कलेक्शनने सर्वसामान्य लोकांसाठी त्या भेटवस्तू आपल्या दालनात उपलब्ध करून दिल्या आहे, ही मोठी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. या गोष्टीचा सर्वसाधारण लोकांना नक्कीच फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

अशा आगळ्यावेगळ्या चांगल्या प्रकारच्या दर्जेदार वस्तू मिळण्याचे दुकान अहमदनगरसारख्या ठिकाणी सुरु केल्याबद्दल अनेक मान्यवरांनी संचालक सय्यद अन्सार यांचे भरभरून कौतुक केले.

संचालक सय्यद अन्सार मोहम्मद शफी कादरी, सय्यद मुस्तफा अन्सार, सय्यद अहमद अन्सार, सय्यद अली अन्सार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख नासिर हाजी हाफीजुद्दीन, सैय्यद इब्राहिम, शरीफ खान, सकलैन रिजवान, सैय्यद असीम सादीक, समीर इब्राहिम शेख, अमजद शेख, अरबाज पठाण, बासीत शेख, फैरोज शेख दौंडवाले, परवेज शेख, रिजवान दिलावर खान आदींनी परिश्रम घेतले.

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment