Ahmednagar News: 'ऑटो क्लस्टर'च्या 'कौशल्य विकास'मुळे अनेक बेरोजगार युवकांना 'रोजगार' उपलब्ध होईल, त्यांचा 'विकास' होईल, - लिना देशपांडे; भारत फोर्ज सीएसआरतून डिजिटल सीएनसी सिम्युलेशन लॅबचे उदघाटन - Rayat Samachar
Ad image

ahmednagar news: ‘ऑटो क्लस्टर’च्या ‘कौशल्य विकास’मुळे अनेक बेरोजगार युवकांना ‘रोजगार’ उपलब्ध होईल, त्यांचा ‘विकास’ होईल, – लिना देशपांडे; भारत फोर्ज सीएसआरतून डिजिटल सीएनसी सिम्युलेशन लॅबचे उदघाटन

छायाचित्र - श्रीकांत वंगारी
63 / 100

अहमदनगर | २४ सप्टेंबर | श्रीकांत वंगारी

ahmednagar news केंद्र शासनाने ग्रामीण भागातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणून त्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने कौशल्य योजना सुरू केली. ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून प्रत्येक घटकाला प्रशिक्षित करून त्यांचा सर्वांगीण विकास करणे खूप गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील भारत फोर्जच्या सीएसआर प्रमुख लिना देशपांडे यांनी केले. अहमदनगरच्या एमआयडीसीतील ऑटो क्लस्टरमध्ये भारत फोर्ज लि. यांच्या सीएसआर सहकार्यातून डिजिटल सीएनसी सिम्युलेशन लॅबचे उद्घाटन देशपांडे यांच्या हस्ते फित कापून व दीपप्रज्वलनाने संपन्न झाले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

याप्रसंगी ऑटो क्लस्टरचे कायदेशीर सल्लागार प्रवीण शुक्ला, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अरविंद पारगांवकर, आमी संघटनेचे जयद्रथ खाकाळ, अहमदनगर ऑटो क्लस्टरचे चेअरमन दौलत जानकू शिंदे, सिमोसॉफ्टचे संचालक सुनील चौरे, ग्लोबलरीच स्किलचे संचालक योगेश भुसा, ऑटो क्लस्टरचे संचालक कारभारी भिंगारे, अविनाश बोपर्डीकर, मिलिंद कुलकर्णी, चिन्मय सुकथनकर, शशांक कुलकर्णी, राजीव गोरे, सतीश साळवेकर, विजय इंगळे, नागराज बडगेरी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

देशपांडे पुढे म्हणाल्या, अहमदनगर ऑटो क्लस्टरमार्फत राबविल्या जात असलेल्या कौशल्य विकास योजनेमुळे अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांचा विकास होईल, असे सांगून ऑटो क्लस्टरचे विशेष अभिनंदन केले.

ऑटो क्लस्टरचे चेअरमन दौलत जानकू शिंदे म्हणाले, अहमदनगर ऑटो क्लस्टरच्या वतीने केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत विविध कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याचा आतापर्यंत अनेकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे उद्योजकांना कुशल कर्मचारी वर्ग उपलब्ध होत आहे. औद्योगिक क्षेत्र वाढीच्या दृष्टीने कुशल कामगार वर्ग खूपच गरजेचा असतो. आता ही गरज पूर्ण होत आहे. याबरोबरच त्यांनी कौशल्य विकासची इत्यंभूत माहिती देऊन अहमदनगर ऑटो क्लस्टरच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध कौशल्य विकास याविषयी माहिती दिली.

यावेळी प्रवीण शुक्ला, सुनील चौरे, योगेश भुसा आदींनी मत व्यक्त केले. मोठ्या संख्येने उद्योजक कार्यक्रमास उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर आभार स्नेहा रसाळ यांनी मानले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment