अहमदनगर | १ सप्टेंबर | हेमंत ढाकेफळकर
Health होमिओपॅथी, अॅलोपॅथी आणि आयुर्वेद हे उपचार आरोग्यासाठी उपयुक्त आहेच, परंतू त्यांच्या जोडीला नॅचरोपॅथीचा उपयोग आरोग्यासाठी केला जावु शकतो. हल्ली साध्यासाध्या आजारात घरगुती उपचार न करता एकदम डॉक्टरांकडे जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे औषधे, तपासण्या, स्कॅन, सोनोग्राफी करावयास सांगतात. याबरोबरच नॅचरलपॅथी उपयोग केल्यास ते आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन डॉ.हेमांगी पोतनिस यांनी केले.
सावेडी जेष्ठ नागरिक मंच यांच्यावतीने नॅचरोपॅथी विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पोतनिस बोलत होत्या. मंचाचे शरद कुलकर्णी, मोरेश्वर मुळे, पुष्पा चितांबर, सुरेश कुलकर्णी, सर्वोत्तम क्षिरसागर, बलभिम पांडव, बाजीराव जाधव, शोभा ढेपे आदी उपस्थित होते.
यावेळी त्या म्हणाल्या की, घरगुती उपचार करतांना रात्री झोप न आल्यास तळपायाला तुप लावणे, किंवा सर्दी खोकला झाल्यास आलं, सुंठ, हळद, पुदिना यांचा काढा घेणे, तसेच सांधेदुखीवर तीळाचे तेल लावुन गरम पाण्याने अभ्यंग स्नान करावे. योग्य आहार विहार याबरोबरच ओमकार साधना करावी. यामुळे मोठमोठे आजार बरे होतात.
यावेळी ऑगस्ट महिन्यातील सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाजीराव जाधव, प्रास्तविक शरद कुलकर्णी, तर आभार सुरेश कुलकर्णी यांनी मानले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा