पाथर्डी | २० ऑगस्ट | पंकज गुंदेचा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व श्री छत्रपती शिवाजी विद्यालय कासार पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त education २०० पुस्तके विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली. यावेळी महा.अंनिसचे विष्णू गायकवाड म्हणाले, डॉ.दाभोलकरांना विज्ञाननिष्ठ समाज घडवायचा होता. प्रश्न विचारणारी, उत्तरे शोधू पाहणारी, आव्हाने पेलणारी पिढी घडवू पहात होते परंतु समाजकंटकांना हे पचले नाही, त्यांनी गोळ्या घालून हत्या केली. डॉ. दाभोलकर एक व्यक्ती गेली पण त्यांचे विचार पेरण्यासाठी असंख्य दाभोलकर तयार झाले. यापुढे वाचन संस्कृती वाढवून ही चळवळ अशीच फोफावत जाण्यासाठी आपल्या सारख्या तरूणाईने सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
डॉ. दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यीनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून बहीण भावंडाचे नाते अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजश्री दुशिंग होत्या. तर मंचावर विद्या गोबरे, मनिषा जाधव, मंगल लवांडे, जयश्री वाघमोडे, किर्ती भांगरे, भागवत आव्हाड, भताने विजय आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक गोरखनाथ रेपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र वांढेकर, शंकर बरकडे, अमोल लवांडे, सचिन पवार, संजय आठरे, संजय शिंदे, प्रशांत अकोलकर, संजय गायकवाड भाऊसाहेब, औसेकर भाऊसाहेब आदींनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक अभयसिंह चितळे यांनी तर सुत्रसंचालन शिवाजी लवांडे यांनी केले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा