ngo: हांडाजींच्या कुटुंबासोबत युवानिर्माण शिबिर संपन्न - Rayat Samachar

ngo: हांडाजींच्या कुटुंबासोबत युवानिर्माण शिबिर संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
69 / 100

अहमदनगर | १७ ऑगस्ट | प्रतिनिधी

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ नगर ९०.४ एफएम यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहालय संचलित युवा निर्माण युवा शिबिररामध्ये युवा जलसंवर्धक अभियानाअंतर्गत ‘छोटे पाऊल मोठा बदल, हंडाजींच्या कुटुंबासोबत’ कार्यक्रम ता. १४ ऑगस्ट रोजी निंबळक येथील स्नेहालय संचालित ngo मानसग्राम प्रकल्पामध्ये पार पडला.

कार्यक्रमामध्ये एकूण १५० युवक – युवती सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे पाणी फौंडेशनचे सुभाष नानावटे आणि स्नेहालय संचलित उडान प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक प्रवीण कदम उपस्थित होते. आपण पाण्याची बचत कशी करू शकतो ? आपण किती पाणी वेस्ट करतो? पाणी कसे वापरायला हवे ? पावसाचे पाणी कसे अडवायचे ? तसेच सध्या देशात पाण्याची स्थिति कशी आहे, याबद्दल सुभाष नानावटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित युवकांनी देखील त्यांच्या गावातील पाण्याचे प्रश्न सांगितले. यावर चर्चा देखील करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी पाणी वाचवण्यासंदर्भात प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रतिज्ञा आर जे कोमल यांच्या मागे सर्व युवक आणि उपस्थित मान्यवरांनी घेतली. सूत्रसंचालन दिपक धायतडक त्यांनी तर आर जे गीता यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतरित्या पार पाडण्यासाठी रेडिओ नगरचे प्रकल्प समन्वयक संदीप क्षीरसागर आणि रेडिओ नगरच्या सर्व टीमने परिश्रम घेतले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment