पाथर्डी | १६ ऑगस्ट | राजेंद्र देवढे
“…तर तुमचे पैसे बँकेतून परत काढून घेऊ”, या आ.रवि राणा यांनी केलेल्या politics भंपक विधानामुळे आज अचानक बँकांसमोर महिलांनी गर्दी केली. उन्हाचे असह्य चटके बसत असूनही महिलांनी बँकांसमोर गर्दी केल्याने नोटबंदीच्या आठवणी परत एकवार जाग्या झाल्या. परंतु, यावेळी मात्र तसे काही कारण नसून लाडक्या बहिणींना गर्दीविषयी विचारले असता, आ. रवि राणांचा प्रताप समोर आला.
याविषयी अधिक माहिती अशी, काल बहुतांशी लाडक्या बहिणींच्या खात्यांत, त्यांच्या लाडक्या भावांनी पैसे जमा केले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी आ.रवि राणा यांनी निवडणुकीत आशिर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांतून पैसे परत काढून घेण्याचे भंपक विधान केल्याने, आलेले पैसे बँकेतून काढून घेण्यासाठी आज शहरातील बँकांसमोर लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी झाली. त्यातच सुटीचे दिवस असल्यानेही काही महिलांनी आज बँकांत गर्दी केली. यापैकी काही बहिणींच्या खात्यांत पैसे जमा न झाल्याने केवायसी करण्यासाठी त्याही या रांगेत उभ्या होत्या.
सध्या पावसाने उघडीप दिल्याने पिकांना खत देणे, खुरपणी व फवारणीसारखी कामे सुरू आहेत. त्यासाठीही शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे, ज्यांच्या खात्यांवर पैसे जमा झाले आहेत त्या महिलांनी बँकांसमोर गर्दी केली होती. तरीही कुतुहलापोटी उन्हातान्हात रांगेत उभ्या असलेल्या बहिणींना विचारले असता या गर्दीमागे आ.रवि राणांनी उधळलेली मुक्ताफळे हे मुख्य कारणच कारणीभूत असल्याचे वास्तव समोर आले.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहिर केल्यापासून शहरात ये जा करणाऱ्या महिलांची गर्दी वाढली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड हा मुख्य पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. अनेक महिलांच्या आधारकार्डवर चुका असल्याने, आधार केंद्रचालकांची चांदी झाली. कारण आधारकार्डवर असलेल्या चुकांची दुरुस्ती करून देण्यासाठी, ते मागतील तितके पैसे महिला मोजत आहेत.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा