Culture: ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचे २४ नोव्हेंबर रोजी उद्घाटन - Rayat Samachar

Culture: ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेचे २४ नोव्हेंबर रोजी उद्घाटन

रयत समाचार वृत्तसेवा
59 / 100

मुंबई | २३ नोव्हेंबर | गुरुदत्त वाकदेकर

Culture महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २४ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. ही स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात आली.

स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-१ केंद्रावर सुरू होत आहे. या स्पर्धेमध्ये विविध Culture १८ नाट्य संस्थांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.

स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :
रवि. २४ नोव्हें. सायं. ७ वा. फ्रिज महादेव लेखक : सिद्धेश साळवी, सुरज कोकरे दिग्दर्शक : सुरज कोकरे विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई
सोम. २५ नोव्हें. स. ११:३० वा. द इंटरव्यू लेखक : रमाकांत जाधव दिग्दर्शक : विलास गायकवाड सुलु नाट्य संस्था, वाशी, नवी मुंबई
सोम. २५ नोव्हें. सायं. ७ वा. अशी गर्लफ्रेंड हवी लेखक व दिग्दर्शक : प्रा. अवधूत भिसे सावली प्रतिष्ठान, मुंबई
मंगळ. २६ नोव्हें. सायं. ७ वा. पांढरपेशी वेश्या लेखक व दिग्दर्शक : राजेश मयेकर साईदत्त सेवा मंडळ, मुंबई
बुध. २७ नोव्हें. स. ११:३० वा. ती रात्र लेखक : हेमंत एदलाबादकर दिग्दर्शक : समीर पेणकर प्रबुद्ध फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई
बुध. २७ नोव्हें. सायं. ७ वा. डियर किट्टी लेखक : चकोर शाह दिग्दर्शक : संदेश गायकवाड प्रबोधन युवा संघ, मुंबई
गुरु. २८ नोव्हें. सायं. ७ वा. पाकिट लेखक व दिग्दर्शक : अभिमान अजित पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई
शुक्र. २९ नोव्हें. सायं. ७ वा. वांझ लेखक : रवींद्र वाडकर दिग्दर्शक : वासंती भगत नवी मुंबई म्युझिक अॅण्ड ड्रामा सर्कल, वाशी
शनि. ३० नोव्हें. स. ११:३० वा. मुखवटे लेखक : गौरव गावडे, प्रतिमा कांबळे दिग्दर्शक : गौरव गावडे मृत्युंजय मित्र मंडळ
शनि. ३० नोव्हें. सायं. ७ वा. घात लेखक व दिग्दर्शक : अनुराधा गुप्ते मंच नाट्य संस्था, मुंबई
रवि. १ डिसें. सायं. ७ वा. अशब्द लेखक व दिग्दर्शक : तेजस सर्पे देवांश सामाजिक सेवा संस्था
सोम. २ डिसें. स. ११:३० वा. मेला तो शेवटचा होता लेखक : विजय खानविलकर दिग्दर्शक : शैलेश फणसगावकर गोदरेज अॅण्ड बॉयज् श्रमिक संघ, मुंबई
सोम. २ डिसें. सायं. ७ वा. लिअर ने जगावं की मरावं? लेखक : जयंत पवार दिग्दर्शक : योगेश कदम धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई
मंगळ. ३ डिसें. स. ११:३० वा. दोन ध्रुव आणि काचेचे गुलाब लेखक : सुधन्वा पानसे दिग्दर्शक : प्रवीण जाधव डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाऊंडेशन
मंगळ. ३ डिसें. सायं. ७ वा. ना ते आपुले लेखक : विजय देशमुख दिग्दर्शक : गुलाब लाड ग्रामीण समाज प्रबोधिनी, मुंबई
बुध. ४ डिसें. स. ११:३० वा. झेंडा रोविला लेखक : राहुल बेलापूरकर दिग्दर्शक : महेंद्र दिवेकर हॅप्पी ग्रुप, मुंबई
बुध. ४ डिसें. सायं. ७ वा. मुक्ता लेखक : प्रवीण धोपट दिग्दर्शक : उदय जाधव केसेंट थिएटर संस्था
गुरु. ५ डिसें. स. ११:३० वा. अरे अरे बाबा लेखक व दिग्दर्शक : संकेत तांडेल अमर हिंद मंडळ, मुंबई
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्यावतीने विकास खारगे (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच विभीषण चवरे संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नाट्य संस्थांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे.
Share This Article
Leave a comment