politics: पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांचे 'युनिटी ऑफ वुमन' नावाने भव्य स्मारक उभारणार - अ‍ॅड.अभय आगरकर; सावेडी विभाग अधिवेशन उत्साहात संपन्न - Rayat Samachar

politics: पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांचे ‘युनिटी ऑफ वुमन’ नावाने भव्य स्मारक उभारणार – अ‍ॅड.अभय आगरकर; सावेडी विभाग अधिवेशन उत्साहात संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
64 / 100

अहमदनगर | १६ ऑगस्ट | अमोल भांबरकर

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यु ऑफ युनिटीसारखे ‘युनिटी ऑफ वुमन’ नावाने भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प असून या प्रकल्पांतर्गत त्यांच्या कारकिर्दितील अनेक प्रसंग शिल्पसृष्टीव्दारे उभारण्यात येणार आहे, या कामासाठी politics पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करुन द्यावा. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्याने आणि त्यांचे जन्मगाव आपल्या जिल्ह्यात असल्याने संपुर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे आहे. आगामी वर्षभरात चांदणीचौक येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर चौक नामकरण, शहरातील उड्डाणपुल स्तंभावर तैलचित्र रेखाटने या कामासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन शहरजिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.

सावेडी येथे भारतीय जनता पार्टीचे अधिवेशन मोठ्या उत्साहाने पार पडले. याप्रसंगी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष अभय आगरकर, भाजपचे प्रदेश सदस्य वसंत लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, दामोदर बठेजा, सरचिटणीस सचिन पारखी, ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सावेडी मंडलाचे अध्यक्ष नितीन शेलार, महिला अध्यक्ष प्रिया जानवे आदी उपस्थित होते.

यावेळी वसंत लोढा म्हणाले कि, सावेडी विभागाने नेहमीच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे मताधिक्य मिळवून दिले आहे. भाजपाच्या १४ नगरसेवकांपैकी आठ नगरसेवक सावेडीतून निवडून दिले आहेत. लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत सावेडीकरांनी भाजपला मताधिक्य देऊन हे दाखवून दिले आहे. कोणतीही युती नसताना आंबेडकर यांना कमी अवधीमध्ये ४० हजार मते मिळाली. महायुतीची नगर शहराची जागा जर भाजपाला मिळाली तर शंभर टक्के भाजपाचा उमेदवार निवडून येईल, असा विश्‍वास आम्ही वरिष्ठांना दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत दोन टक्के मते कमी पडली. असे का घडले एवढे मोठे काम करूनही फक्त २८ हजारांचा फरक पडला आहे. याचा विचार करणे आवश्यक आहे. पुणे येथील अधिवेशनात नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे. परंतु या निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येकाने मैदानात उतरून लढावे. याचा अर्थ असा होतो की. महायुतीचा उमेदवार आपल्यापैकी कोणीही असू शकतो. ज्यांना उमेदवारी करायचे त्यांनी मतदार संघात लक्ष घालावे. २०१४ साली महायुतीच्या काळात मोठेमोठे मेळावा झाले. परंतु अवघ्या निवडणुकीच्या पाच दिवस अगोदर युती तुटली व स्वतंत्र निवडणूक करावी लागली. राजकारणात काहीही होऊ शकते. तर फडणवीस साहेब म्हणाले तसे मैदानात उतरा व लढा द्या, असे सांगितले.

अभय आगरकर पुढे म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीत अपयश जरी आले तरी खचून जाऊ नका. नगर शहरात भारतीय जनता पार्टीने बत्तीस हजारांचे मताधिक्य दिले आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी योजनांची माहिती नागरिकांना द्यावी तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्षाचे विचार सामान्य घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटितपणे काम करावे, असे ते म्हणाले.

VIRAJ TRAVELS
Ad image

नगरची विधान सभेची जागा भाजपाला द्यावी, हा ठराव महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केला. त्याला सर्वानुमते अनुमती देण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे बाबासाहेब सानप, संगिता खरमाळे, राजेंद्र काळे, रविंद्र बारस्कर, तुषार पोटे, अनिल ढवण, सतिष शिंदे, सुजित खरमाळे, रोहित पठारे, साहेबराव विधाते, बाळासाहेब पाटोळे, बाळासाहेब गायकवाड, प्रशांत मुथा, सुमित बटोळे, बंटी डापसे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिन पारखी यांनी केल तर आभार कैलास गर्जे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सावेडी विभागातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तारकपूर परिसरातील इंग्लिशस्कूलमधून महिलांच्या तक्रारीमुळे हकालपट्टी केलेला पदाधिकारी थेट अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीस्थळी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment