अहमदनगर | प्रतिनिधी
history ऑगस्ट क्रांतिदिन, जागतिक आदिवासी दिन आणि इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०२ व्या जयंतीचे औचित्य साधत शुक्रवारी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात ‘हेरिटेज वाॅक’ आयोजित करण्यात आला. किल्ल्यात भटकंती करत असताना ऋणानुबंध ग्रुपने सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरणात रंग भरला. या उपक्रमाचे आयोजन ‘स्वागत अहमदनगर हेरिटेज वाॅक’ व ‘ऋणानुबंध’च्या वतीने करण्यात आले.
मणिपूरचे विद्यार्थी आणि पुण्याहून आलेले इतिहासप्रेमीही या वाॅकमध्ये सहभागी झाले होते. भूषण देशमुख आणि अमोल बास्कर यांनी किल्ल्याची माहिती दिली. ॲड.श्याम आसावा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या दुर्बीण महाल, फराहबख्श महाल आणि भुईकोट किल्ल्याच्या पोस्टरचे प्रकाशन भूषण देशमुख, ऋणानुबंधचे अध्यक्ष अजित रोकडे व सीएसआरडीमधील बीव्होक जेएमसीचे विद्यार्थी भैरवनाथ वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘ऋणानुबंध’च्या गायकांनी देशभक्तीपर गीते सादर केली. डॉ. विवेकानंद कंगे यांनी ‘मेरे देश की धरती’, सारिका रघुवंशी व दुर्गा हुरे यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ म्हटले. डॉ. गायत्री कुलकर्णी, डॉ.दमन काशीद, महेश घावटे, भानुदास महानोर, सुशील देठे, अजित रोकडे, डॉ.शैलेंद्र खंडागळे, चारुदत्त ससाणे, प्रशांत बंडगर, रत्ना शिरसाळकर, नीता माने यांनीही गीते सादर केली.
प्रतिभा साबळे यांनी ‘नेता कक्षा’त ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे शौर्यगीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमासाठी डॉ. नितीन जगताप, सचिन परदेशी, डॉ. उमेशचंद्र सुद्रिक, सुनील महाजन आणि ज्ञानेश्वर यांनी परिश्रम घेतले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area
Wow, your blog layout is incredible! How long have you been blogging? You make it seem so effortless. The design of your website is stunning, and the content is equally impressive.