paris olympic 2024: अमन सेहरावतने भारतासाठी जिंकले सहावे पदक - Rayat Samachar

paris olympic 2024: अमन सेहरावतने भारतासाठी जिंकले सहावे पदक

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
70 / 100

मुंबई | १० ऑगस्ट | गुरुदत्त वाकदेकर

कुस्तीपटू अमन सेहरावतने paris olympic 2024 मधे १४ व्या दिवशी भारताला कांस्यपदक मिळवून दिले. अमनला गुरुवारी पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाइल गटाच्या उपांत्य फेरीत जपानच्या अव्वल मानांकित रे हिगुचीकडून एकतर्फी पराभव पत्करावा लागला. अशाप्रकारे त्याचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले, पण कांस्यपदक जिंकून त्याने देशाचा गौरव केला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो फ्रीस्टाइल प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कुस्तीपटू अमन सेहरावतचे अभिनंदन केले. मोदींनी इंस्टाग्रामवर लिहिले, ‘आमच्या कुस्तीपटूंचे आभार आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल ५७ किलो गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अमन सेहरावतचे अभिनंदन. त्यांचे समर्पण आणि जिद्द स्पष्टपणे दिसून येते. संपूर्ण देश या उल्लेखनीय कामगिरीचा आनंद साजरा करत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमनने भारताला कुस्तीत पहिले पदक मिळवून दिले. त्याने ५७ किलो फ्रीस्टाइल गटातील कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या डॅरियन टोई क्रूझचा १३-५ गुणांनी पराभव केला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अमन हा भारताचा एकमेव पुरुष कुस्तीपटू होता. मात्र, त्याने आपली पदकांची घोडदौड कायम राखली. २००८ बीजिंग ऑलिम्पिकपासून भारत प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पदके जिंकत आला आहे. २००८ मध्ये सुशील कुमारने कांस्यपदक जिंकले, सुशीलने रौप्य आणि योगेश्वर दत्तने २०१२ मध्ये कांस्य, साक्षी मलिकने २०१६ मध्ये कांस्य आणि २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियाने कांस्य तर रवी दहियाने रौप्यपदक जिंकले. अमनचे हे पहिलेच ऑलिम्पिक होते आणि त्याने पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीमध्ये आपले खाते उघडले. विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर निराश झालेल्या भारताला त्याने आनंद दिला आहे.

भारताचा पुरुष संघ हीट २ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ३:००:५८ च्या वेळेसह ५ व्या स्थानावर राहिला. अमोल जेकब, राजेश रमेश, संतोष कुमार, मुहम्मद अजमल, मुहम्मद अनस यांचा समावेश असलेला भारतीय संघ ४X४०० मीटर रिलेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.

भारतीय महिला संघ ३:३२:५१ च्या वेळेसह १६ संघांमध्ये १५ व्या स्थानावर राहिला आणि ४×४०० मीटर रिलेच्या अंतिम फेरीसाठी पात्रता गमावली.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गोल्फ स्पर्धेच्या दोन फेऱ्यांनंतर भारतीय गोल्फपटू आदिती अशोक आणि दीक्षा डागर ६० खेळाडूंमध्ये १४व्या स्थानावर आहेत. आदितीने पहिल्या फेरीत वन अंडर ७१ चे कार्ड खेळले होते, तिने दुसऱ्या फेरीत वन अंडर ७१ चे कार्ड खेळले होते. दुसऱ्या फेरीत तिने सहाव्या ते नवव्या होलमधून सलग चार बर्डी केली. त्याने तिसरे, पाचवे आणि १२ वे होल बोगी केले. दीक्षाने पहिल्या फेरीत ७१ चे कार्ड मिळवले होते, तिला दुसऱ्या फेरीत ७२ च्या समान बरोबरीचे कार्ड खेळता आले. तिसऱ्या होलनंतर ती दोन अंडरवर होती पण १८ व्या होलवर तिने डबल बोगी केली.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

हे हि वाचा : पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याने जगाला केले चकित

Share This Article
Leave a comment