happy life:दिव्यांगांच्या हातावर 'रचना'ची मेहंदी - Rayat Samachar

happy life:दिव्यांगांच्या हातावर ‘रचना’ची मेहंदी

रयत समाचार वृत्तसेवा
72 / 100

अहमदनगर | ७ ऑगस्ट | प्रतिनिधी

नागपंचमी सणानिमित्त रचना कला महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी एक happy life सामाजिक उपक्रम राब‌विण्यात येतो. उपक्र‌मांतर्गत महाविद्यालयाच्या वतीने अनामप्रेम संस्थेतील अंध व दिव्यांग विद्यार्थीनींच्या हातावर मेहंदी काढून त्यांना भेटवस्तु देण्यात आल्या. त्यांच्या अंध:कारमय जीवनात कलेच्या माध्यमातून प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मेहंदीच्या आनंदी उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या संचालिका वर्षा शेकटकर, प्राचार्या जबीन शेख व महाविद्यालयातील विद्यार्थीनींचे सहकार्य मिळाले. या उपक्रमास अनामप्रेम संस्थेच्या डाॅ.मेघना मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदविण्याची विनंती

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment