राहुरी | ७ ऑगस्ट | पंकज गुंदेचा
तालुक्यातील खडांबे येथील जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्री शाहू विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांना शाहू परीवाराच्या वतीने केशर आंब्याची रोपे वितरीत करण्यात आली. संजय रोकडे यांच्या प्रयत्नातून हा biodiversity उपक्रम राबविला. राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते आंबा रोपे वितरीत केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात प्रत्यक्ष विद्यार्थी सहभाग ही अत्यंत कौतुकास्पद आहे. हीच काळाजी गरज असून नव्या पिढीच्या प्रयत्नांना सर्वांनी साथ दिली पाहिजे, त्यांनी पुढे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यालयातील शैक्षणिक तसेच क्रीडा, विज्ञान प्रदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षा यामधील विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी गुणवंत विद्यार्थी गौरव समिती’ कार्यरत असून साडेपाच लाखांचा ठेवींच्या व्याजातून गुणवंत विद्यार्थ्याना स्वातंत्र्यदिनी सत्कार करते. विद्यालयातील गरजू होतकरू विद्यार्थांसाठी विद्यार्थी सुवर्ण कल्याण योजना राबविली जाते. त्यामध्ये २.२५ लाखांच्या व्याजातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजाची पुर्तता केली जाते.
उपक्रमाचा हेतु विशद करताना विद्यालयाचे पर्यवेक्षक शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना बालवयातच निसर्गाचे संवर्धन करण्याची सवय लागावी. पर्यावरणाचे संतुलन राबण्याच्या जबाबदारीची जाणीव व्हावी ही भावना व्यक्त केली. ग्लोबल वार्मिंगमुळे उन्हाळ्यात पारा ४५° च्या पार गेला होता. वातावरणाचे तापमान वाढत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त झाडे लावून त्यांची जोपासना करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिक्षक राहुल जाधव यांचा रस्ते वाहतुक व सुरक्षा (RSP) चे प्रशिक्षण घेतल्याबद्दल पोलिस निरिक्षक ठेंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निसर्गसंवर्धनाच्या उपक्रमासाठी मुख्याध्यापक जयसिंग नरवडे, अविनाश रामफळे, महेंद्र रसाळ, संतोष कारले, संदीप बांगर, गणेश कुहे, अर्जुन लंगोटे, प्रसाद साठे, श्रीकांत म्हसे, बापू दूशिंग, कुसमुडे मिनिनाथ, बाळासाहेब मेहत्रे, अविनाश अमृते, डबरे, आसाल, म्हस्के, कल्हापुरे, अडसुरे, थोरात, पो.हे.कॉ. अशोक शिंदे, पो.कॉ. सय्यद उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवावी