अहमदनगर | भैरवनाथ वाकळे
मुळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संस्थापक शरद्चंद्र पवार यांनी आज जागतिक nature व्याघ्र दिनानिमित्त आपल्या सामाजिक माध्यमांमधून फार महत्वाचा संदेश दिलेला आहे. ते म्हणतात, निसर्ग आणि जैवसाखळीतील एक महत्त्वाचा घटक असलेल्या वाघांचे संरक्षण आणि संवर्धन ही पर्यावरण समतोलासाठी अनिवार्य बाब आहे. व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांचे संवर्धन यासाठी जनजागृती करण्याचा या जागतिक व्याघ्र दिनानिमित्त निर्धार करुया.
पवार यांनी अहमदनगर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघासह राज्याला संदेश देवून वाघांचे महत्व अधोरेखित केले आहे. जैवसाखळीतील एक महत्वाचा घटक असल्याने त्याचे संरक्षण व संवर्धन करणे ही अनिवार्य बाब आहे, असे ते ठामपणे सांगतात.
महाराष्ट्रासह अहमदनगर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे असल्याचेही यातून दिसून येत आहे. व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यांचे संवर्धन यासाठी जनजागृती करणे फार गरजेचे आहे. असे जागतिक व्याघ्र दिनानिमित्त निर्धार करण्याचा त्यांचा आग्रह आहे.