जामखेड | रिजवान शेख,जवळा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची mpsc पीएसआयची परीक्षा पास होण्याचे अनेक तरुण, तरुणींचे स्पप्न असते. अनुकूल परिस्थितीत बरेचजण यश मिळतात परंतु प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी घालणारे कमीच असतात. अशाच प्रतिकूल परिस्थितीतून सोहन चांगदेव हजारे याने नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे.
सोहन अवघ्या दहा वर्षाचा असतानाच माजी सैनिक असलेले वडिल चांगदेव हजारे यांचे अपघाताने निधन झाले. त्यानंतर आई मंगलने मोठ्या कष्टाने मोठी मुलगी शितल, मुलगा पवन व सर्वात लहान मुलगा सोहन या तिघांनाही चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले. सोहनने वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. तो परीक्षेची तयारी करत असताना मोठा भाऊ पवन आर्थिक व मानसिक पाठबळ देऊन खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा राहिला. सोहनाने आईच्या व भावाच्या कष्टाची जाण ठेवून हे यश मिळवले. त्याच्या यशामुळे आई, बहीण व भाऊ यांना अभिमान वाटेनं असे यश संपादन केले आहे. सोहनचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा