Mother India:आदर्शमाता लक्ष्मीबाई बारस्कर यांची एकसष्टी उत्साहात साजरी - Rayat Samachar
Ad image

mother india:आदर्शमाता लक्ष्मीबाई बारस्कर यांची एकसष्टी उत्साहात साजरी

64 / 100

अहमदनगर | तुषार सोनवणे

mother india प्रत्येकालाच आयुष्यात अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असते तरीसुद्धा त्यातही जिद्द, चिकटीपणा असेल तर त्यातूनही अनेकजण मार्ग काढतात. असेच उदाहरण म्हणजे सावेडीगावातील श्रीमती लक्ष्मीबाई मोहन बारस्कर. दोन मुली व एक मुलगा लहान असतांनाच पतीचे दुःखद निधन झाले. शेती वगैरे काहीच नव्हते, अश्या वेळेस माहेरच्यांकडे लक्ष लागलेले असते. परंतु तिथेही अशीच जेमतेम परिस्थिती. त्यामुळे सगळीकडे अंधार दिसत होता. परंतु लक्ष्मीबाई या नावाप्रमाणेच झाशीच्या राणीप्रमाणे पदर खोचून घराबाहेर पडल्या. काम केले नाही तर तीन मुलांना खाऊ कसे घालायचे. त्यांचे शिक्षणही लिहीत वाचता येईल एवढेच. त्यामुळे जे हातात येईल ते काम करण्याची तयारी ठेवली. प्रथमतः मोठ्या बंगल्यात धुणीभांडी करण्याचे काम सुरू केले. सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा जवळ असल्यामुळे हळूहळू बरीच कामे मिळत गेली. मुलेही मोठी होत होती.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

लवकरच दोन्ही मुलींचे लग्न मोठ्या धामधुमीत लावून दिले. दोन्ही स्थळे चांगली भेटल्यामुळे त्यांच्या सासरचा काही ताण राहीला नाही. मुलीही आनंदाने नांदत आहेत परंतु तिकडे आपली आई अजूनही धुण्याभांड्याचे काम करत आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा अमोल याने आईचा एकसष्ठवा वाढदिवस जोरात साजरा करायचा असे ठरवले. त्याने ही कल्पना दोन्ही बहिणींना म्हणजेच संगीता काळे व सविता ठाणगे यांना सांगितली त्यांनीही लगेच होकार दिला. आईला मात्र याची काहीही कल्पना नव्हती.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

अहमदनगरच्या एका हॉटेलमधील हॉलमध्ये संपूर्ण सजवून आईचा एकसष्ठवा वाढदिवस साजरा करण्यात आला. यासाठी जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी असे मिळून १५० लोक हजर होते. आईला फेटा बांधून औक्षण केल्यानंतर केक कापला. आईच्या व मुलींच्या डोळ्यात अश्रू होते परंतु ते आनंदाश्रू होते.

यावेळी उपस्थितांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे, हिंदुराष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे, आरएसएस-बीजेपीचे पुढारी तथा माजी जि.प.उपकार्यकारी अधिकारी नितीन उदमले, चंद्रकांत जाधव, अर्बन बँक बचाव समितीचे सीए राजेंद्र काळे यांची भाषणे झाली.

सर्वांच्या भाषणातून एकच स्वर होता आणि तो म्हणजे आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी डगमगायचे नाही. जिद्द, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी असेल तर जीवनात काहीही अशक्य नाही. सर्वांनी अमोल बारस्कर याचे कौतुक केले कारण एकीकडे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारी मुले आहेत तर दुसरीकडे अमोलसारखी आपल्या आईच्या कष्टाची जाण ठेऊन तिच्या आनंदासाठी तिचा एकसष्ठावा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करणारी.

यावेळी वाकोडीच्या सरपंच मंगल गवळी, विठ्ठल बारस्कर, संदीप ऊर्फ भाऊ बारस्कर, अंकुश बारस्कर आदी उपस्थित होते.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

TAGGED:
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment