नगर तालुका | प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त ह.भ.प. हरिभाऊ महाराज भोंदे व ह.भ.प. कृष्णा महाराज रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ता. २८ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहकाळात पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ८ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, ६ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरीकिर्तन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
सप्ताहकाळात ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज भिसे, ह.भ.प.दत्तात्रय महाराज जगताप, ह.भ.प.पांडुरंग महाराज आवरकर, ह.भ.प.निळकंठ महाराज रायकर, ह.भ.प.गणेश महाराज पाटील, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज शिंदे, ह.भ.प.हरिभाऊ महाराज भोंदे यांची कीर्तनसेवा होणार आहे. रविवारी ता. ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ ह.भ.प.पुंडलिक जंगलेशास्त्री यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद वाटप होईल. सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.