अहमदनगर | पंकज गुंदेचा
पँथर्स भीम संग्राम सामाजिक संघटनचा अहमदनगर जिल्हा परिषदेच्या Fraud अनागोंदी कारभाराविरूध्दचे १५ जुलैपासून सुरू असलेला बेमुदत बैठा सत्याग्रह हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मागण्यांपैकी एक मागणी होती की, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक निलंबित करावे, परंतु ते अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नसल्याने ज्यांना हे अधिकार आहेत त्या ठिकाणी मु.का. अधिकारी यांनी शिफारस करावी, अशी विनंती करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी हे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना आजही पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणाधिकारी फार चांगले आहेत, पण तक्रार केली ती महिला मनोरुग्ण आहे. असे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात तर मग तिला सेवानियुक्तीचे पत्र कोणी दिले याचा खुलासा अधिकारी अहमदनगर यांनी करावा.
शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पाथरवाला उपकेंद्र या केंद्रात २०१६ ते २०२२ या कालखंडात जो जन्म मृत्यूचा नोंदीचा घोटाळा झाला. यावर वैद्यकीय अधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांची मुदत देखील आज संपलेली आहे. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहेत. अशी लेखी पत्र आरोग्याधिकारी यांनी दिले आहे.
खरवंडी तालुका नेवासा येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्या तीन पगारवाढी कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या असून त्यांच्यावर अजूनही राहिलेली जी काही शिक्षा असेल ती निश्चित करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे देखील उपमुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांनी लिखित दिले आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जळाली किंवा जाळली असे आमचे म्हणणे होते. त्यावर जिल्हा आरोग्याधिकारी यांनी लेखी दिले आहे की, वैद्यकीय अधिकारी यांनी पो.स्टे.ला एफआय दाखल केला आहे. त्यामध्ये शेवटची ओळ आहे की ‘आकस्मित जळीत दाखल होणेस विनंती आहे’ असे एफआयआर मध्ये म्हटले आहे मग तो एफआयआर खरा की खोटा त्यात किती सत्य आहे? हे आम्ही न्यायालयात आमचे म्हणणे मांडणार आहोत, कारण जळीतकांडामध्ये वैद्यकीय अधिकारी तिसगाव यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न सर्व अधिकारी करत आहेत.
यावेळी आंदोलन कार्यकर्ते सी.पी.क्षेत्रे, भाऊसाहेब नवगिरे, सिध्दार्थ क्षेत्रे, सतिष साळवे आदी सहभागी होते.