राहुरी | प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा स्कॅश रॅकेट असोसिएशन संलग्न महाराष्ट्र राज्य स्कॅश रॅकेट असोसिएशन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथील महिला जिमखाना कृषी विद्यापीठ येथे जिल्हास्तरीय स्कॅश स्पर्धा संपन्न झाल्या.
स्पर्धेत डि पाॅल इंग्लिश मेडियम सी.बी.एस.ई. मधील इ.८ वीतील विद्यार्थीनी व अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांची कन्या सहर्षा साळवे हिने १५ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय स्कॅश स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी गोल्डमेडल व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात आले. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्कॅश स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
अभूतपूर्व यशाबद्दल डि पाॅल इंग्लिश मेडियम स्कूल येथे ग्रॅन्ड पॅरेंटस डे कार्यक्रमात प्रिन्सिपल फादर सिजो व व्हाईस प्रिन्सिपल सिस्टर दिप्ती यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सहर्षाला प्रशिक्षक विजय लोंढे, जिल्हा सचिव घनश्याम सानप, क्रिडा शिक्षक संदिप निबे यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल शिक्षक अशोक पवार, आशिष आमोलिक, उज्वला माघाडे, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटना महिला प्रदेशाध्यक्षा स्नेहा कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष मुश्ताकभाई तांबोळी, उपाध्यक्ष सुनिल कानडे, खजिनदार साधना चुडिवाल, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, जीम प्रशिक्षक अनिल साळवे यांनी विशेष अभिनंदन केले.