पारनेर | प्रतिनिधी
शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी ज्येष्ठ नेते, सेवानिवृत्त पोलीस पाटील बबनराव सालके नेहमी सक्रिय काम करतात. अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली हे जवळा गावच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी व्यक्त केले. जवळा येथे अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हाध्यक्षपदी सालके यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार, सन्मान करण्यात आला, यावेळी घावटे बोलत होते.
ते पुढे म्हणाले, बबनराव सालके हे शेतकऱ्यांसाठी काम करत असताना वीज, पाणी, दूध या प्रश्नांवर प्रामुख्याने काम करतील. आंदोलनात्मक भूमिकेमधून ते शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतील.
कॉम्रेड बबनराव सालके यांची नुकतीच अहमदनगर येथे झालेल्या किसान सभेच्या बैठकीमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचबरोबर सहयोगी कार्यकारणीची निवड करण्यात आली. जिल्हा सचिवपदी आप्पासाहेब वाबळे तर खजिनदारपदी भगवानराव गायकवाड यांची निवड करण्यात आली तसेच सोबत जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. या सर्वांचे राज्य सेक्रेटरी कॉ. राजन क्षीरसागर, ॲड. सुभाष लांडे, ॲड. बन्सी सातपुते, स्मिता गोविंद पानसरे, संतोष खोडदे यांनी खास अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सत्कारप्रसंगी लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲड. रामदास घावटे, कॉ. कैलास शेळके, निवृत्त सैनिक रामदास सालके, माजी कृषी अधिकारी संभाजी सालके पाटील, मंगेश सालके, गोविंद बडवे, गजानन सोमवंशी, विमा प्रतिनिधी संतोष यादव, अरुण सोमवंशी, ज्येष्ठ नेते जयसिंग सालके पाटील, संपत सालके, गोरख सालके आदींसह ग्रामस्थ व बबनराव सालके यांचा मित्रपरिवार तसेच अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखिल भारतीय किसान सभेचे नूतन जिल्हाध्यक्ष बबनराव सालके यांनी आभार मानून शेतकरीहितासाठी सर्वांनी सोबत काम करत साथसहयोग देण्याचे आवाहन केले.