धनशक्ती पेक्षा दानशक्ती समाजबदल घडवणार - राहुल बांगर; महास्कील टेक इनोव्हेटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने 'ज्ञानसाहित्य वाटप मोहिम' सुरू - Rayat Samachar
Ad image

धनशक्ती पेक्षा दानशक्ती समाजबदल घडवणार – राहुल बांगर; महास्कील टेक इनोव्हेटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने ‘ज्ञानसाहित्य वाटप मोहिम’ सुरू

अहमदनगर | पंकज गुंदेचा

महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने श्रमिकनगरमधील मार्कंडेय शाळेमध्ये १ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना केवळ चांगली शाळा, शिक्षक मिळणे महत्वाचे नाही तर शैक्षणिक साहित्यसुद्धा मिळणे महत्वाचे आहे. शासनाने शाळांमध्ये मोफत पुस्तके पुरवली असली तरीही लिहिण्यासाठी वही आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतात आणि दुदैवाने काही विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होत नाही. या समस्येला केंद्र मानून मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाची मोहीम या माध्यमातून सुरु करण्यात आली, असल्याची माहिती राहुल बांगर यांनी दिली.
कर्तव्यम् फाऊंडेशन आणि हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स यांच्या सहयोगाने कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी आभार मानले. समाजातील विषमता दूर करण्यासाठी दानशक्ती महत्त्वाची असून धनशक्ती पेक्षा दानशक्तीने समाजामध्ये मूलभूत परिवर्तन घडेल असा आशावाद याप्रसंगी महास्किलचे डायरेक्टर राहुल बांगर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिजित चिंतामणी, अविनाश मुंडके, दिलीप गाडेकर, महेश पवार, कृष्णा आखमोडे आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी आदींनी सहकार्य केले. यावेळेस प्राचार्य दगडे व शाळेतील शिक्षकवर्ग यांचे सहकार्य लाभले.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

याच प्रकारे अन्य शाळेत देखील असा उपक्रम होणार असून, या ‘ज्ञानसाहित्य वाटप मोहिमे’स जोडण्यासाठी संस्थेच्या 9011193700 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment