१७ जुलैपासून ऐतिहासिक ब्राह्मी लिपीचे ऑनलाईन वर्ग; तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन - Rayat Samachar

१७ जुलैपासून ऐतिहासिक ब्राह्मी लिपीचे ऑनलाईन वर्ग; तात्काळ नोंदणी करण्याचे आवाहन

1 Min Read

पुणे | प्रतिनिधी

येत्या १७ जुलैपासून ऐतिहासिक ब्राह्मी लिपीचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात येणार असून त्यासाठी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन ब्राह्मी लिपी तज्ञ सोज्वळ साळी यांनी केले आहे.

त्यांनी सांगितले की, ब्राह्मी ही भारतातील २ हजार वर्षे जुनी असणारी लिपी आहे. या लिपिमध्ये भारतात सम्राट अशोकाच्या काळापासून शेकडो लेख लिहिले गेले आहेत. महाराष्ट्रात देखील सातवाहनकाळापासून या लिपीचा वापर झालेला दिसून येतो. चौथ्या शतकापर्यंत ही लिपी अस्तित्वात होती आणि भारतातील इतर सर्व लिपी ब्राह्मीमधूनच तयार झाल्या असे सांगतात.

ते पुढे म्हणाले, ही लिपी शिकवण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत १० दिवसांचा ऑनलाइन अभ्यासवर्ग. ता. १७ जुलै ते २७ जुलै २०२४ या दरम्यान रोज रात्री ९ ते १० यावेळेत वर्ग होणार असून त्यासाठी १५००/- रूपये शुल्क आकारण्यात येईल.

अभ्यासवर्ग ब्राह्मी लिपी तज्ञ मार्गदर्शन सोज्वळ साळी हे घेणार आहेत. यामधे  असणार आहेत. १. ब्राह्मीची ओळख व इतिहास,२. ब्राह्मी बाराखडी, ३. ब्राह्मी जोडाक्षरे, ४. लेखन सराव, ५. शिलालेख वाचन सराव, ६. ब्राह्मीतील आकडे. तसेच या कोर्सच्या नोट्स उपलब्ध होतील आणि कोणतेही सेशन मिस झाल्यास त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देण्यात येईल.

कोर्स संपल्यावर सर्व सहभागी व्यक्तीना सर्टिफिकेट देण्यात येतील. अधिक माहिती व कोर्ससाठी नोंदणी करण्यासाठी 7020402446 या क्रमांकावर शुल्क पाठवून मेसेज करावा, असे कळविण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment