अहमदनगर | पंकज गुंदेचा
येथील रोटरी क्लब, अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व रा.स्व.संघ संचलित जनकल्याण रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे, चार्टर्ड अकाउंटंट व कृषी डे निमित्त विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य व प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया, क्लबचे माजी अध्यक्ष माधव देशमुख, दीपक गुजराती, सुभाष गर्जे, दिलीप कर्नावट, प्रशांत बोगावत, क्षीरसागर, रविंद्र राऊत, राजेश उपाध्ये, नेहा जाधव, अनघा राऊत, साधना देशमुख, अशुलता थाडे आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे नूतन अध्यक्ष नितीन थाडे यांनी रोटरी क्लब सामाजिक संस्थेचे महत्व विषद करताना नवीन वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये प्रामुख्याने शाळा व महाविद्यालय अंतर्गत इंटरॅक्ट रोटरॅक्ट क्लबची स्थापना जिल्ह्यात विविध ठिकाणी. कॅन्सर रोग निदान, मानसिक आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर घेण्यासंदर्भात भर दिला. डिसेंबर महिन्यात सर्व रोटरी क्लबच्या माध्यमातून फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस रोटरी क्लब ऑफ अहमदनगर व अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज यांच्या वतीने सी.ए. अमर देशमुख व सी.ए. हर्षल गुगळे यांचा सी.ए. डे निमित्त सत्कार करण्यात आला.
रोटरी क्लबचे जेष्ठ सदस्य डॉ. प्रकाश कांकरिया यांनी म्हटले की, होमिओपॅथीक कॉलेजच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यात होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व रोटरी क्लब अहमदनगर द्वारे विद्यार्थीसाठी विशेष नेत्ररोगनिदान शिबीर तसेच रोज योग मेडिटेशन शिबीर आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील पवार तसेच जनकल्याण रक्तकेंद्राचे डॉ. गुलशन गुप्ता यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. रोटरी क्लबचे जेष्ठ सदस्य महावीर मेहेर यांनी ८४ व्या वेळेस तसेच राजेश उपध्याय यांनी ४४ व्या वेळेस रक्तदान केले. माधव देशमुख यांनी आभार प्रदर्शनात मागील वर्षात रोटरी क्लबद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एकूण ८५ उपक्रमांची माहिती तसेच कृषी दिनाचे महत्व विषद केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा.स्व.संघाच्या जनकल्याण रक्त केंद्राचे डॉ. विलास मढीकर, डॉ. गजेंद्र सोनवणे, डॉ. खंडारे तसेच होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या डॉ.सोनाली वारे, डॉ. वैशाली काकडे, डॉ. सोले तसेच रोटरी असिस्टंट डी. गव्हर्नर पुरुषोत्तम जाधव, प्रसन्न खाजगीवाले यांनी विशेष परिश्रम घेतले.