अहमदनगर |प्रतिनिधी
हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख आणि संशोधन केंद्र समन्वयक प्रा. डॉ. ज्योती पापा बिडलान यांचे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एवम भारतीय राजनीत व एक अध्ययन’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकांमध्ये भारतीय राजकारण आणि राष्ट्रीय सेवा स्वयंसेवक संघाची भूमिका कार्य, साधने,उद्दिष्टे व नवभारतीय राजकारणातील घडामोडी, जनमताचा कौल, भारतीय संस्कृती पैलू, एक राष्ट्रीय स्तरावरील संघटन इत्यादी घटकांची सविस्तर मांडणी केली आहे.
पुस्तक राष्ट्रीय प्रकाशनद्वारे हिंदी भाषेत प्रकाशित झालेले असल्याने सामान्य वाचकाला सहज समजेल या हेतूने डॉ.ज्योती बिडलान यांनी पुस्तकाची मांडणी केलेली आहे. वरील पुस्तक राज्यशास्त्रातील पदवी पदवीत्तर आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थी प्राध्यापक यांना निश्चित उपयुक्त ठरेल.
पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल प्राचार्या.डॉ.माहेश्वरी गावित, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि मॅनेजमेंट काऊन्सिल सदस्य, डॉ. प्रा. गिरीश कुलकर्णी, प्राचार्य डॉ. विलास आवारी, प्राचार्य डॉ.सुनील कवडे, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे प्राचार्य आणि राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन राजधर टेमकर, डॉ.वहिदा शेख, अहमदनगर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सुधीर वाडेकर,
अहमदनगर महाविद्यालयातील गांधी अभ्यास केंद्र समन्वयक आदींसह प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.