जाणीवपुर्वक कर्जे थकविणारे कर्जदार व इतर आरोपींविरूद्ध प्रभावी व जलद कारवाई करावी; आवसायक गणेश गायकवाड यांनी एसआयटीकडे केली मागणी - Rayat Samachar

जाणीवपुर्वक कर्जे थकविणारे कर्जदार व इतर आरोपींविरूद्ध प्रभावी व जलद कारवाई करावी; आवसायक गणेश गायकवाड यांनी एसआयटीकडे केली मागणी

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

अहमदनगर | प्रतिनिधी |२६.६.२०२४

वैभवशाली नगर अर्बन बँकेला फसवून जाणीवपुर्वक कर्जे थकविणारे कर्जदार व इतर आरोपींविरूद्ध प्रभावी व जलद कारवाई करावी. त्यातून बँकेच्या वसूलीला वेग येईल व ठेवीदारांना ठेवींच्या रकमा परत करण्यास मदत होईल. अशा स्वरूपाचे निवेदन नगर अर्बन बँकेचे आवसायक गणेश गायकवाड यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक तसेच नगर अर्बन बँक घोटाळा तपासावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन एसआयटीचे प्रमुख प्रशांत खैरे यांना दिले.

यावर खैरे यांनी बँकेला पुर्ण सहकार्य करण्याची श्वासती दिली. दोषींवर लवकरच कडक कारवाईला वेग देणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रसंगी झालेल्या चर्चेत बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा व ॲड. अच्युत पिंगळे यांनी अनेक मुद्दे मांडले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *