अनिता काळे यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार प्रदान; शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल - Rayat Samachar

अनिता काळे यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार प्रदान; शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

रयत समाचार वृत्तसेवा
अहमदनगर (प्रतिनिधी) १३.६.२०२४
मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा तथा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त झालेल्या राज्यस्तरीय पाचव्या काव्य संमेलनात काळे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत असल्याने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा केळगंद्रे-शिंदे, उद्योजक माधव लामखडे, काव्य संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, ज्येष्ठ कवी आनंदा साळवे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, कवी सरोज अल्हाट, गझलकार रज्जाक शेख, मिराबक्ष शेख, उद्योजक दिलावर शेख आदी उपस्थित होते.
अनिता काळे या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्यादानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहिम चालवित आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन उत्तम प्रकारे महिला संघटन केले आहे. व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Share This Article
Leave a comment