विजेचा लपंडाव थांबवा; भाजपा युवा मोर्चाची महावितरणकडे आग्रही मागणी; अन्यथा आंदोलन ! - Rayat Samachar

विजेचा लपंडाव थांबवा; भाजपा युवा मोर्चाची महावितरणकडे आग्रही मागणी; अन्यथा आंदोलन !

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) १२.६.२४

शहरात गेल्या महिन्यापासून विजेचे भारनियमन सुरू असून सध्या पाऊस सुरू झाल्यापासून शहरात दिवसरात्र विजेचा लपंडाव सुरू आहे. तो त्वरित थांबवा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालय कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब कुमावत यांना करण्यात आली. यावेळी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुघोळ, उपाध्यक्ष अजित कोतकर, विशाल शितोळे, आदेश गायकवाड, अमोल थोरात, श्रेयस नराल आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मयूर बोचूघोळ यांनी म्हटले की, विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. रात्री अपरात्री विजेचा पुरवठा खंडित होऊन वीजपुरवठा लवकर सुरळीत होत नाही. शहरात महावितरणला फोन लावला असता फोन उचलला जात नाही, यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. तरी लवकर उपायोजना करून नागरिकांना त्रासमुक्त करावे.
यावर कार्यवाही केली नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करेल, असे मयूर बोचुघोळ म्हणाले.

About The Author

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *