मुंबई | १ फेब्रुवारी | संदिप पवार
(latest news) राज्यातील एसटी प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये, यासाठी कंडक्टरांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी ‘अग्रधन’ रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने याबाबतचे परिपत्रक काढल्याचे समजते.
(latest news) प्रवाशांनी यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे देण्याचे आवाहन केले. यास प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुप्पटीने वाढले आहे. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.
हे ही वाचा : History: बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी