मुंबई | गुरुदत्त वाकदेकर
Nandesh Umap: मातृभूमीवरील प्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि देशभक्तीची भावना जागविणारे ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत भारतीयांच्या मनात अढळ स्थान राखून आहे. या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्या सहभागातून विशेष संगीतनिर्मिती करण्यात आली आहे. ही विशेष निर्मिती १४ ऑगस्ट २०२६ रोजी नंदेश उमप यांच्या अधिकृत YouTube वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.
‘वंदे मातरम्’ हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे. या विशेष निर्मितीसाठी नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी संगीत दिले असून नंदेश उमप आणि उदय साळवी यांनी संगीत संयोजन केले आहे. उदय साळवी यांनी संगीत प्रोग्रामिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
या निर्मितीत सत्यजित जामसांडेकर यांनी रिदम अरेंजमेंट आणि प्रोग्रामिंग केले आहे. लाइव्ह रिदममध्ये सत्यजित जामसांडेकर, प्रसाद मयेकर, तेजस सातार्डेकर आणि मयूर मगरे यांचा सहभाग आहे.
सितारवादन रवि चारी, तर बासरीवादन विजय तांबे यांनी केले आहे. ‘स्टुडिओ एएमव्ही’ येथे हर्ष भोईर यांनी ध्वनिमुद्रण केले आहे.
या निर्मितीचे मिक्स आणि मास्टरिंग तुषार पंडित यांनी केले आहे. व्हिडिओचे श्रेय विश्वास राख यांना देण्यात आले असून व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्सची जबाबदारी शशांक एस. कोंडविलकर यांनी सांभाळली आहे.
या विशेष संगीतनिर्मितीत रुपाली पाटील, पूनम पगारे, प्राजक्ता माहुलकर, महेक शेख, गौरी डोंगरे, नंदेश उमप, प्रसाद विभुते, अभिषेक गाडेकर, दिनेश नाडकर आणि अतुल पोडवाल यांच्या स्वरांचा सहभाग आहे.
या विशेष निर्मितीच्या निर्मात्या सरिता नंदेश उमप आहेत. संगीत, गायन, वाद्यसंगीत, रिदम आणि दृक्-श्राव्य निर्मिती अशा विविध अंगांचा समन्वय या निर्मितीत साधण्यात आला आहे.
गायनासोबत सितार, बासरी आणि लाइव्ह रिदमचा वापर करण्यात आला असून संगीत संयोजन, प्रोग्रामिंग, ध्वनिमुद्रण, मिक्स-मास्टरिंग, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स अशा विविध तांत्रिक अंगांचीही सांगड घालण्यात आली आहे.
‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ साकारण्यात आलेली ही विशेष संगीतनिर्मिती १४ ऑगस्ट २०२६ रोजी सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्या अधिकृत YouTube वाहिनीवरून प्रसारित होणार आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


