श्रीगोंदा | माधव बनसुडे
Scholarship Selection: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२५-२६ च्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत देऊळगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता चौथीतील चि. शंभूराजे बाबर आणि इयत्ता सातवीतील कु. तनुजा बाबर या दोघांचीही राज्य शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. या यशामुळे शाळेसह संपूर्ण देऊळगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, स्पर्धात्मकता आणि अभ्यासातील सातत्य तपासणारी प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. अशा स्पर्धात्मक परीक्षेत देऊळगाव शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी राज्य शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत उल्लेखनीय यश मिळविल्याने गावाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका यशाची भर पडली आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना गोरे मॅडम, तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना गावडे मॅडम, नागरगोजे सर आणि लाटे सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांकडून नियमित सराव करून घेत तसेच परीक्षा पद्धतीची सखोल तयारी करून घेतल्यामुळे हे यश मिळविणे शक्य झाल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी शंभूराजे बाबर आणि तनुजा बाबर यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


