Shishu Sahitya Sammelan Pune: “छान छान हसा, छान छान दिसा”; बालांमध्ये उद्याचे कुसुमाग्रज, पाडगावकर, शांता शेळके दिसतात : डॉ. मधुसूदन घाणेकर - Rayat Samachar

Shishu Sahitya Sammelan Pune: “छान छान हसा, छान छान दिसा”; बालांमध्ये उद्याचे कुसुमाग्रज, पाडगावकर, शांता शेळके दिसतात : डॉ. मधुसूदन घाणेकर

पुण्यात पहिले शिशू साहित्य संमेलन उत्साहात; ‘शूर शिशू’ काव्यसंग्रहाचे बालकांच्या हस्ते प्रकाशन, विविध पुरस्कारांचे वितरण

rayatsamachar
3 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

पुणे | गुरुदत्त वाकदेकर

Shishu Sahitya Sammelan Pune: बालांमध्ये उद्याचे कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर आणि शांता शेळके दिसतात. बालांनी छान छान हसावे, छान छान दिसावे, असे प्रतिपादन ‘शिशू विश्व’ संस्थेतर्फे आयोजित पहिल्या शिशू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या ‘शूर शिशू’ या काव्यसंग्रहाचे तसेच डॉ. घाणेकर संपादित ‘डहाळी संमेलन विशेषांका’चे उपस्थित बालकांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
संमेलनाचे उद्घाटन गोपाळ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा लोंढे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला मधुकर्णिका फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मधुकर्णिका सासवडे, प्राचार्य सचिन वाल्मिकी आणि तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या बालसचिव एम. अजया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल नागवडे यांनी केले. प्रीति कनगरे यांनी प्रास्ताविक केले, तर अनुश्री घाणेकर यांनी आभार मानले.
संमेलनानिमित्त काव्य सादरीकरण आणि ‘माझी शाळा’ निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
काव्यस्पर्धेत आरोही मोडकर हिने प्रथम, धवलभाई चौधरी याने द्वितीय, तर साई लांजेकर याने तृतीय क्रमांक पटकावला. श्रद्धा मदने आणि अवनिश केंजळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
‘माझी शाळा’ निबंध स्पर्धेत श्रद्धा मदने हिने प्रथम, अनन्या खंडागळे हिने द्वितीय, तर यश ढावरे याने तृतीय क्रमांक मिळवला. विहान जगताप आणि यशवंत म्हेत्रे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.
यावेळी मधुकर्णिका सासवडे, एम. अजया, प्राचार्य सचिन वाल्मिकी आणि मंजुषा लोंढे यांनीही उपस्थित बालकांना मार्गदर्शन केले.
समारोपप्रसंगी डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी त्यांच्या ‘बे दुणे चकली’ या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमाची झलक सादर केली. त्यांच्या विनोदी सादरीकरणाला बालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या सोहळ्यात शिशू विश्व संस्थेतर्फे डॉ. मधुसूदन घाणेकर यांना आंतरराष्ट्रीय बालसाहित्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मंजुषा लोंढे यांना आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार, तर मधुकर्णिका सासवडे, एम. अजया, शीतल नागवडे आणि अनुश्री घाणेकर यांना बालसाहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नीला विद्वांस आणि ज्योतिर्विद परशुराम कुंभार उपस्थित होते. एम. अजया आणि दीपाराणी गोसावी यांच्या हस्ते बालांना खाऊवाटप करण्यात आले.
काव्य, निबंध, बालसाहित्य, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण आणि एकपात्री सादरीकरण अशा विविध उपक्रमांनी रंगलेले पहिले शिशू साहित्य संमेलन बालसाहित्याच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारे ठरले.

Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?

- Advertisement -

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading