Delhi Farmer Protest | अमेरिकन ट्रेड डीलविरोधात दिल्लीत शेतकरी आक्रमक; राजू शेट्टी व महादेव जानकर पोलिसांच्या ताब्यात - Rayat Samacharअमेरिकन ट्रेड डीलविरोधात Delhi Farmer Protest आंदोलन; राजू शेट्टी व महादेव जानकर पोलिसांच्या ताब्यात

Delhi Farmer Protest | अमेरिकन ट्रेड डीलविरोधात दिल्लीत शेतकरी आक्रमक; राजू शेट्टी व महादेव जानकर पोलिसांच्या ताब्यात

Delhi Farmer Protest | अमेरिकन ट्रेड डीलविरोधात दिल्लीत शेतकरी आक्रमक; राजू शेट्टी व महादेव जानकर पोलिसांच्या ताब्यात

rayatsamachar
1 Min Read
अमेरिकन ट्रेड डीलविरोधात दिल्लीतील आंदोलनासाठी गेलेल्या राजू शेट्टी व महादेव जानकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहितीSubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | २१.७ | रयत समाचार

(Delhi Farmer Protest) अमेरिकेसोबत होणाऱ्या संभाव्य व्यापार (ट्रेड) कराराच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटना दिल्लीत आक्रमक झाल्या आहेत. देशातील १५४ शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी दिल्लीतील किसान घाट येथे दाखल झाले असून, केंद्र सरकारच्या व्यापार धोरणाविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

- Advertisement -

(Delhi Farmer Protest) दरम्यान, शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनासाठी दिल्लीतील राजघाट परिसरात जात असताना त्यांच्यासह महादेव जानकर यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.

(Delhi Farmer Protest) राजू शेट्टी यांनी सांगितले की, अमेरिकन ट्रेड डीलचा भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या हितावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध शेतकरी संघटना एकत्र येत केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी दिल्लीत जमल्या आहेत.

Delhi Farmer Protest दिल्लीतील शेतकरी आंदोलक राजू शेट्टी आणि महादेव जानकर

या आंदोलनामुळे दिल्लीतील राजघाट आणि परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, पुढील घडामोडींवर देशभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading