Yashwant Vidyalaya Shiral | पालक शिक्षक संवादासह वृक्षारोपणाचा संदेश; यशवंत विद्यालयाचा 1अभिनव उपक्रम - Rayat Samachar पालक शिक्षक मेळावा व वृक्षारोपणाची सांगड; Yashwant Vidyalaya Shiralचा अभिनव उपक्रम

Yashwant Vidyalaya Shiral | पालक शिक्षक संवादासह वृक्षारोपणाचा संदेश; यशवंत विद्यालयाचा 1अभिनव उपक्रम

पालक शिक्षक मेळाव्यानिमित्त यशवंत विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
पालक शिक्षक मेळाव्यानिमित्त यशवंत विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेSubEditor | Dipak Shirasath

पाथर्डी | १४.७ | पंकज गुंदेचा

शिराळ येथील यशवंत विद्यालयात (Yashwant Vidyalaya Shiral) पालक शिक्षक मेळावा आणि वृक्षारोपण उपक्रमाची अनोखी सांगड घालत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून विद्यालयाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.

Image Alt Text: Yashwant Vidyalaya Shiral पालक शिक्षक मेळावा आणि वृक्षारोपण कार्यक्रम

शनिवारी ता. ११ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास वृक्षप्रेमी शंकरराव कन्हेरकर, डॉ. शिवाजीराव घोरपडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल वाघ, सुवर्णा रविंद्र मुळे, मेजर पंढरीनाथ मुळे, शिक्षणप्रेमी नागरिक आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. (Yashwant Vidyalaya Shiral) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक नानासाहेब काळे होते.

Image Alt Text: Yashwant Vidyalaya Shiral पालक शिक्षक मेळावा आणि वृक्षारोपण कार्यक्रम

- Advertisement -
यावेळी मुख्याध्यापक काळे यांनी (Yashwant Vidyalaya Shiral) विद्यालयातील भौतिक सुविधांच्या उभारणीसाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्यालयाच्या मागील वर्षातील विविध परीक्षांच्या निकालांचा आढावा ज्येष्ठ शिक्षक रविंद्र ज्योतिक यांनी सादर केला.

हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद

याच कार्यक्रमात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हा संघटकपदी निवड झाल्याबद्दल शंकरराव कन्हेरकर यांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमात राजश्री दुशिंग यांनी शिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सविता घुणे यांनी, तर आभार प्रदर्शन सीमा ठाकूर यांनी केले.

हे ही पहा : History | युद्ध संपले, माणुसकी जिवंत राहिली : १३ जुलै १६००, सुलताना चांदबीबी स्मृतिदिन

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख दगडखैर, शेख, झिने, भापकर, ग्रंथपाल दरेकर, लिपिक आनंद साळवे तसेच शिक्षकेतर कर्मचारी अशोक मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading